नाशिक । नगर सह्याद्री
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे मंत्री सकाळी 7 पासून मंत्रालयात मलिदा कमवायचे काम करत होते, अशा गद्दारांना लोकसभेची निवडणूक व्याज होती, मुद्दल विधानसभा आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अजित पवारांसह सरकारवर गंभीर टीका केली आहे.
अजित पवारांनी वेदांत फस्कॉन महाराष्ट्रात आणून दाखवावं असं चॅलेंज करत नाशिक जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिलय असं ते म्हणाले. दिंडोरी ते लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर आता नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आहेत.
राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अजित पवारांसह सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हे मंत्री सकाळी 7 पासून मंत्रालयात मलिदा कमवायचे काम करत होते असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. गद्दारांना धडा शिकवणारी लोकसभेची निवडणूक ही व्याज होती. मुद्दल विधानसभा निवडणूक असणार आहे. लोकसभा तो झाकी हे विधानसभा बाकी है असं म्हणत मेहबूब शेख यांनी सरकारवर कडाडून टीका केलीय.