पारनेर। नगर सहयाद्री-
मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदीचा निर्णय असताना कांदा उत्पादक शेतकरांना दिलासा देण्यासाठी वेळेच्या आधी केंद्र सरकारने शब्द पाळला असल्याचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांबाबत मोठा निर्णय घेत अखेर कांद्याच्या निर्यातीवरील बंदी करण्याचा रविवारी अध्यादेश काढला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून कांदा उत्पादकांच्या अर्थव्यवस्थेला झळाळी देणार्या या निर्णयाचे व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांचे ही ग्रामीण भागातील शेतकर्यांचा प्रतिनिधी म्हणून आपण पारनेर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांच्या वतीने े स्वागत करत असल्याचे मत महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे विद्यमान सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर भाजपाच्या वतीने पारनेर शहराच्या एस टी स्टँड चौकात रविवारी दुपारी घोषणा देत व फटाके फोडत केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे, लहु भालेकर, सागर मैड, पारनेर भाजपचे उपाध्यक्ष अर्जुन नवले, संदीप सालके, संपत सालके, किसनराव शिंदे, शब्बीरभाई इनामदार, तुषार पवार यांसह तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारने निर्यात बंदीची घोषणा केल्यापासून आजतागायत अहमदनगर दक्षिणेचे विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनीही निर्यातबंदी उठविण्यासाठी जिल्ह्याचे जबाबदार प्रतिनिधी म्हणून सातत्याने केलेल्या यशस्वी प्रयत्नांबद्दल त्यांचेही विश्वनाथ. कोरडे यांनी आवर्जून पारनेर तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने आभार मानले. डिसेंबर महिन्यात कांद्याच्या किमती वेगाने वाढल्याने कांदा १०० रुपये किलो विकला जात होता.
कांद्याचे उत्पादन आणि किंमतींबद्दल मिळालेल्या चुकीच्या माहितीमुळे केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात ८ तारखेला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत होती. परंतु ही बंदी ग्रामीण भागातील शेतकर्यांचे हित लक्षात घेवून व शेतकर्यांतून होत असलेल्या मागणीनुसार बंदीची अंतिम मुदत संपण्यापूर्वीच हटवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपा सरकारने वेळेच्या आधी शब्द पाळला: विश्वनाथ कोरडे
कांदा उत्पादक शेतकरांना दिलासा देण्यासाठी भाजपा सरकारने निर्यातबंदीचा निर्वेणय ळेच्या आधी शब्द पाळला विश्वनाथ कोरडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी देखील केंद्र सरकारच्या वतीने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याची शक्यता असल्याचे सांगतले जात होते. कांदा उत्पादक भागातील कांदा आणि इतर भाज्यांचे भाव कोसळणे व त्यामुळे शेतकरी वर्गातून होत असलेल्या मागणीला न्याय देणे हेच त्याचे प्रमुख कारण होते. आता केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली असल्याचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे व भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.