spot_img
ब्रेकिंग..'तो' शब्द पाळला!! मतांसाठी नव्हे तर हितासाठी जागणारे सरकार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

..’तो’ शब्द पाळला!! मतांसाठी नव्हे तर हितासाठी जागणारे सरकार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री-
मराठा आरक्षणाच्या’महामोर्चा’ ला यश आले आहे. लाखो मराठा बांधवांसह निघालेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. मतांसाठी नाही तर हितासाठी जागणारे सर्व सामन्याचे सरकार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचा व मराठ्यांच्या वेदना माहित असल्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजाजी शपत घेतली होती. त्यामुळे दिलेला शब्द पाळला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य करत जीआर सुद्धा जारी केला. त्यामळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडले. यावेळी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा पार पडली. यावेळी मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ उपिस्थत होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सकल मराठा समाज्याच्या एकजुटीचाआज विजय झाला आहे. आणासाहेब पाटील यांच्या कर्मे भूमीत हा इतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, मतांसाठी नाही तर हितासाठी जागणारे सर्व सामन्याचे सरकार आहे. आदोलनाची शिस्त, मराठ्याची एकजूट आणि संगर्ष योद्धा मनोज जराजे पाटील यांचे अभिनंन करतो.

मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मला शेतकऱ्याच्या व मराठ्यांच्या वेदना माहित होत्या. त्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजाजी शपत घेतली होती. अनेक मराठा समाज्याचे नेते होते, त्यांना समाजाला न्याय देता आला नाही. राजकीय पाश्ववभूमी नसलेल्या मनोज जराजे पाटील यांच्या मागे जनता उभी राहिली यांचा गर्व आहे.

कुणबी प्रमाण पत्राबाबत शिबीर, टिकणारे आरक्षण, ओबोसी प्रमाणे सवलती, सारथी योजना, अण्णासाहेब महामंडळ योजना, व बलिदान देणाऱ्याना योग्य ती मदत आणि दाखल गुन्हे मागे घेतले जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...