spot_img
मनोरंजनदरवाज्यात येऊन त्याने किस करण्याचा प्रयत्न; कास्टिंग काउचबद्दल अभिनेत्री सुरवीन चावलाचा धक्कादायक...

दरवाज्यात येऊन त्याने किस करण्याचा प्रयत्न; कास्टिंग काउचबद्दल अभिनेत्री सुरवीन चावलाचा धक्कादायक खुलासा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
‘क्रिमिनल जस्टीस सीझन 4’मधून अंजूच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री सुरवीन चावला लवकरच ‘मंडाला मर्डर्स’ या आगामी वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने कास्टिंग काउच संदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे. सुरवीनने सांगितले की, जेव्हा मी कॉम्प्रोमाइज करण्यास नकार दिला, तेव्हा तिच्या हातामधून अनेक मोठे प्रोजेक्ट निघून गेले. सुरवीनच्या या वक्तव्यामुळे सध्या इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे.

वाटायचं की आता इंडस्ट्री सोडून द्यावी
अभिनेत्री सुरवीन चावलाने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये ती म्हणाली की, एक काळ असा होता, जेव्हा इंडस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त कास्टिंग काउचच होतं. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना मनात एक प्रकारचं घाणेरडं वाटायचं. वाटायचं की हे मी नाही करू शकत. असं वाटायचं की आता इंडस्ट्री सोडून द्यावी. कॉम्प्रोमाइज करण्यास नकार दिल्यामुळे अनेक मोठे प्रोजेक्ट देखील तिच्या हातून निघून गेल्याचे तिने म्हटले.

तर मी अनेक वेळा फक्त यासाठी रोल गमावले की मी ‘ना’ म्हणण्याची हिंमत ठेवली. मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. आता वाटतं की मी माझ्या प्रवासात खूप दूर आले आहे. तो काळ खूप कठीण होता. मला गप्प राहावं लागायचं. फक्त स्वतःलाच म्हणायचं मी हे करू शकत नाही. मी इथे यासाठी आलेली नाही.

लग्ननंतरही गैरवर्तनाचा प्रयत्न
त्यानंतर Hauterrfly शी बोलताना अभिनेत्री सुरवीनने आणखी एक धक्कादायक अनुभव शेअर केलाय. तिने सांगितले की, ही गोष्ट तिच्या लग्नानंतर घडली आहे. त्या व्यक्तीचं ऑफिस खूप मोठं होतं. त्याने तिच्याबद्दल विचारपूस केली आणि तिचा नवरा काय करतो हेही विचारलं. जेव्हा ती निघत होती तेव्हा त्याने दरवाज्यापर्यंत येऊन तिला किस करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला जोरात मागे ढकललं आणि त्याच्यावर ओरडली. ‘तुम्ही काय करताय?’ आणि तिथून निघून गेली. सुरवीन चावला हिने 2015 साली उद्योगपती अक्षय ठक्कर याच्याशी विवाह केला आहे. सुरवीनच्या या धक्कादायक उलगड्यामुळे इंडस्ट्रीतील कडू वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे आणि कास्टिंग काउचचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! निंबोडीतील कुटूंबावर हल्ला, बाऊची चौकात काय घडलं?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- निंबोडी गावातील बाऊची चौक येथे गुरुवारी (24 जुलै 2025) सायंकाळी 7...

छोटे मियाँ कंपनीचा बडा डाव!, लाखो रुपयांना फसवले; वाचा प्रकरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नेप्ती मार्केट येथे कांदा खरेदीच्या नावाखाली 26 लाख 41 हजार 379...

चोरी केल्याचा संशय, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; सुप्यात नेमकं काय घडलं?

सुपा | नगर सह्याद्री सुपा पोलीस ठाणे हद्दीतील टोलनाका परिसरात बुधवारी (23 जुलै 2025) पहाटे...

‌‘महाराजस्व‌’ शिबिराचा नागरिकांना मोठा लाभ: आ.काशीनाथ दाते

पारनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर पारनेर | नगर सह्याद्री शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांच्या थेट...