spot_img
अहमदनगरलाडकी बहिण यॊजनासाठी तुम्ही आर्ज केला का? अहमदनगर जिल्ह्यातील ६ लाख ८०...

लाडकी बहिण यॊजनासाठी तुम्ही आर्ज केला का? अहमदनगर जिल्ह्यातील ६ लाख ८० हजार अर्ज मंजूर, वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नगर जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ८ हजार अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे.
दरम्यान, या अर्जांपैकी २५ हजार महिलांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या असून ते तात्पूर्ते रिजेट करण्यात आल्यानंतर महिलांनी पुन्हा माहिती सादर केल्यानंतर त्यांची पुर्नपडताळणी सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नगर जिल्ह्यातील २१ ते ६५ वयोगटातील ७ लाख ८ हजार महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जांची पडताळणी सध्या सुरू आहे. आतापर्यंत ६ लाख ८० हजार लाडया बहिणींचे अर्ज पात्र झाले आहेत. २५ हजारांहून अधिक अर्जांमध्ये त्रुटी होत्या. त्यामुळे हे अर्ज पुन्हा अर्जदाराकडे त्रुटी पूर्ततेसाठी पाठवण्यात आले होते. या अर्जाबाबत संबंधीत महिलांनी माहितीची पुर्ता केल्यामुळे त्यांची पुर्नपडताळणी सध्या सुरू आहे.
रक्षाबंधनचा मुहूर्त साधत राज्य सरकारकडून १७ ऑगस्ट रोजी प्रत्येक लाडया बहिणीच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत. अर्जांची पडताळणी व योजनेच्या संनियंत्रणासाठी अशासकीय सदस्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या नेमून तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे.

अशा आहेत त्रुटी
कागदपत्रे अपूर्ण असणे, आधारकार्डची एकच बाजू अपलोड, माहिती अपूर्ण, बँक डिटेल नसणे, हमीपत्रावर स्वाक्षरी नाही अशा विविध त्रुटी अर्जांमध्ये आढळल्या आहेत. त्यांना त्रुटींची पूर्तता करण्यास मुदत देण्यात आली आहे. ज्यांनी स्वतःच्या मोबाइलवरून अर्ज केला आहे आणि त्यांच्या अर्जात त्रुटी आहे अशांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. तर ज्यांनी महा-ई-सेवा केंद्रांवर किंवा अंगणवाडी सेविकांसह अन्य ठिकाणी अर्ज केले आहेत, त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर त्रुटी पूर्ततेचे मेसेज पाठविण्यात आले आहेत. त्यांनी त्रुटींची पूर्तता केल्यास त्यांना पहिल्या टप्प्यात १७ ऑगस्टला पैसे मिळतील, अन्यथा त्यांना पुढील टप्प्यात लाभाची रक्कम मिळणार आहे.

पात्र लाडया बहिणी
शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत अकाले ४३ हजार ७८३, संगमनेर ८३ हजार ७८८, कोपरगाव ४१ हजार ४०३, श्रीरामपूर ४५ हजार १९, नेवासा ५६ हजार १९, शेवगाव ३६ हजार ४५५, पाथर्डी ३४ हजार ३६, जामखेड २६ हजार ६९७, कर्जत ३६ हजार ७१९, श्रीगोंदा ४२ हजार ६१४, पारनेर ४३ हजार ७९१, राहुरी ५३ हजार २३६, राहाता ५२ हजार ५६९ आणि नगर ८० हजार ८४७ असे ६ लाख ७६ हजार ९७६ अर्ज पात्र ठरले आहेत. ही आकडेवारी शुक्रवारी दुपारी ४ पर्यंत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...