spot_img
अहमदनगरआमदार संग्राम जगताप यांची ‘हॅटट्रिक’! ‘इतक्या’ मतांनी विजय

आमदार संग्राम जगताप यांची ‘हॅटट्रिक’! ‘इतक्या’ मतांनी विजय

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुती राष्ट्रीवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांचा दणदणीत मतांनी पराभव केला आहे. 39 हजार 650 मताधिक्क्याने लीड घेत विजयी हॅटट्रिक आमदार संग्राम जगताप यांनी मारली आहे. पुन्हा एकदा संग्राम जगताप यांच्यावर नगरकरांनी विश्वास दाखविला आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार संग्राम जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर यांच्यात लढत झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही महाविकास आघाडीत उमेदवारीवर एकमत झाले नव्हते. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचा अर्ज निवणुकीच्या रिंगणात कायम राहिला. त्यानंतर गाडे यांनी कळमकर यांना पाठिंबा दिला. परंतु, मनधरणी करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ गेला. तोपर्यंत आमदार संग्राम जगताप यांनी मतदार संघ पिंजून काढला होता.

कळमकर यांच्या प्रचारात शिवसेना ठाकरे गट पूर्णपणे सक्रिय असल्याचे दिसून आले नाही. मतमोजणीच्या पहिल्याफेरीपासून आमदार संग्राम जगताप मताधिक्य घेतली. दरम्यान मुकुंदनगरमधील मतदान केंद्रावरील दोन फेऱ्यांमध्ये कळमकर यांना मताधिक्य मिळाले. त्या दोन फेऱ्यांमध्ये जगताप यांची मताधिक्य घटले.

परंतु, पुन्हा जगताप यांनी प्रत्येक फेरीमध्ये मताधिक्य वाढत गेले. 22 व्या फेरी अखेर आमदार संग्राम जगताप यांना 39 हजार 650 मतांचे मताधिक्य होते. जगताप यांना 1 लाख 17 हजार 55 मते मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना 78 हजार 255 मिळाले. नगर शहर विधानसभा मतदारसंघातील आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाचा निकाल हाती येताच जगताप समर्थकांनी विजयी जल्लोष केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

IPL 2025 : चॅम्पियन RCB ला मिळालं करोडोंचं बक्षीस, पराभूत पंजाबवरही पैशांचा पाऊस, कोणाला किती पैसे मिळाले ?

नगर सह्याद्री वेब टीम - RCB Prize Money IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर...

18 वर्ष वाट पहायला लावलीस मित्रा… IPL चँपियन बनल्यावर विराटची पहिली पोस्ट

नगर सह्याद्री वेब टीम आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये पायनल जिंकत ट्रॉफीवर नाव कोरणं हे...

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता अन् अपघात विमा!

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा...

IPL 2025 Final : आरसीबी आयपीएल चॅम्पियन, विराटचं स्वप्न अखेर पूर्ण

नगर सह्याद्री वेब टीम - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अखेर 17 वर्षांची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवला...