spot_img
अहमदनगरनगरचं राजकीय वातावरण फिरलं? 'बडा' नेता महायुतीची साथ सोडणार!

नगरचं राजकीय वातावरण फिरलं? ‘बडा’ नेता महायुतीची साथ सोडणार!

spot_img

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. आपल्या पहिल्याच यादीत भाजपने ९० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यातच भाजपने राहुरी मतदारसंघात शिवाजी कर्डीले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला आता भाजप विरोध होत आहे. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे कदम कटूंब नाराज आले असून महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजप कडून सत्यजित कदम इच्छुक होते.मात्र उमेदवारी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांना जाहिर झाली. त्यामुळे सत्यजित कदम आणि त्यांचे वडील माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून भाजपविरोधात बंडाचे निशाण फडकवण्याची शक्यता आहे.

२०१९ ला देखील चंद्रशेखर कदम यांनी आपला मुलगा सत्यजित यांच्यासाठी पक्षाकडे राहुरी विधानसभेची मागणी केली होती. मात्र पक्षाने त्यांना सबुरीचा सल्ला देत शिवाजी कर्डिले यांनी उमेदवारी दिली होती. अनेकदा पक्षाचा आदेश मानून निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र आता कार्यकर्ते जे सांगतील त्यानुसार निर्णय घेणार असल्याचे सत्यजित कदम यांनी सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...