मुंबई । नगर सहयाद्री
लाखो महिलांसाठी महत्त्वाची असलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जून महिना संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत आणि अजूनही जून महिन्याचा हप्ता जमा झाला की नाही, अशी चिंता अनेक लाभार्थी महिलांना पडली आहे.
हप्ता कधीही जमा होण्याची शक्यता!
राज्य सरकारकडून योजनेच्या रकमेबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, मागील ट्रेंड पाहता कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
पैसे जमा झालेत का? असा करा ऑनलाईन आणि ऑफलाईन तपास!
ऑनलाइन पद्धत:
तुमच्या बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या अॅपमध्ये लॉगिन करा.
चेक बॅलन्स’ किंवा ‘अकाऊंट स्टेटमेंट’ या पर्यायावर क्लिक करा.
खात्यातील रक्कम तपासा – जर ₹1500 जमा झाले असतील, तर ते तुम्हाला लगेच दिसतील.
अधिक माहिती हवी असल्यास ‘ट्रान्झॅक्शन हिस्ट्री’ पाहून पैसे कोणत्या दिवशी जमा झाले ते समजू शकते.
ऑफलाइन पद्धत:
जवळच्या बँक शाखेत जा आणि पासबुक अपडेट करून घ्या.
एन्ट्रीमध्ये ‘क्रेडिट ₹1500’ दिसल्यास समजावे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे.