spot_img
ब्रेकिंगजातीपेक्षा पक्ष मोठा झाला का? मनोज जरांगे यांचा मराठा नेत्यांवर संताप

जातीपेक्षा पक्ष मोठा झाला का? मनोज जरांगे यांचा मराठा नेत्यांवर संताप

spot_img

छत्रपती संभाजीनगर। नगर सह्याद्री-
मराठा समाजाचे सर्वपक्षीय जे आमदार, मंत्री आहेत त्यांनी सगेसोयरे यांच्याबाबत अधिवेशनात बोला सांगितले. पण एकही मराठा नेता बोलला नाही. हे मोठे षडयंत्र आहे. सर्व मराठा या आरक्षणाचा फायदा घेणार आहे. १० टक्के आरक्षण दिलंय ते ५० टक्क्यांच्या आत द्या. मराठा समाज मागास आहे हे सिद्ध झालंय मग ओबीसीतून आरक्षण का देत नाही. मराठा समाजानं एकजूट राहावे. माझ्याविरोधात टोळी उभी केलीय. उलट्या बुद्धीची लोक मला अटक करा म्हणतायेत. जातीपेक्षा तुम्हाला पक्ष मोठा झाला का? अशी संतप्त भावना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यात जाणुनबुजून जे षडयंत्र सुरू आहे त्याकडे मराठा समाज शांत बघून पाहत आहे. सत्तेचा गैरवापर करून एसआयटी लावली जातेय. हजारो कोट्यवधी घोटाळे करणारे आसपास फिरायला लागलेत. त्यांच्यावर चौकशी लावत नाही. मात्र मी गोरगरिब मराठ्यांचा लढा लढतोय म्हणून माझी चौकशी करतायेत. काहीही झाले, मला जेलला टाकले तरी मी मागे हटत नाही. मी नेत्याला बोललो म्हणून काहींना झोंबलंय. काही आमदार असे तुटून पडलेत जसं पूर्वीचा राग आहे. तुमची माया गोरगरिब मराठ्यांसोबत नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच आमची मूळ मागणी ओबीसी आरक्षण आणि सगेसोयरे यांची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे करावे. मराठ्यांवर चाल करून येऊ नका. मी मराठ्यांसाठी आरक्षण मागतोय. तुमच्या पक्षाला आणि नेत्याला बोललो. तुम्ही गोरगरिब मराठ्यांची पोरं मारायची आहेत का?. माझी काही चौकशी करायची ती करा. मराठा समाजाचे आमदार, मंत्री यांनी ७५ वर्षात मराठ्यांची लेकरं मोठी केली नाही. मला गुंतवलं तर आरक्षण लढा बंद होणार असं त्यांना वाटतं असंही जरांगे म्हणाले.
दरम्यान, मराठे गप्प बसणार नाही. कालपासून बैठका सुरू झाल्यात.

ताकदीने मराठा समाज बैठका घेतोय. मी बोलल्यावर राग कसा येतो? मराठा समाजाचे आमदार, मंत्री खूप मोठी चूक करताय. आंदोलनामुळेच कुणबी दाखले मिळाले, १० टक्के आरक्षणही यामुळेच मिळाले. मराठा नेत्यांनी भानावर या. मी घाबरत नाही. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही. फक्त मला साथ द्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...