spot_img
महाराष्ट्रमंत्री छगन भुजबळांनी खरोखर राजीनामा दिलाय? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं खरं उत्तर..

मंत्री छगन भुजबळांनी खरोखर राजीनामा दिलाय? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं खरं उत्तर..

spot_img

गडचिरोली / नगर सह्याद्री : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. भुजबळांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली असून सध्या ते ओबीसी एल्गार मेळावे घेत आहेत.

शनिवारी (३ फेब्रुवारी) अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा पार पडला. यामध्ये छगन भुजबळ म्हणाले, सरकारमधले काही लोक, विरोधी पक्षातले काही नेते माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. विरोधक मला म्हणतायत की, सरकारचे निर्णय पटत नसतील तर राजीनामा द्या. सरकारमधील एक आमदार म्हणाले, छगन भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळाबाहेर काढा. मला या सर्वांना, माझ्या विरोधकांना, स्वपक्षातील आणि स्वसरकारमधील लोकांना सांगायचं आहे की मी १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला आहे. आंबड येथे १७ नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गारची पहिली रॅली पार पडली. त्या रॅलीच्या एक दिवस आधी, म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

* उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले..
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, भुजबळांच्या राजीनाम्याबद्दल केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकतील. आज मी एवढंच सांगेन की आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. किंवा मुख्यमंत्र्यांनीदेखील भुजबळांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. राजीनाम्याबद्दल केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...