spot_img
अहमदनगरकामावरून काढून टाकल्याने हमालाने व्यापाऱ्याचे ५० लाख लुटले; पाच जण पोलिसांच्या ताब्यात

कामावरून काढून टाकल्याने हमालाने व्यापाऱ्याचे ५० लाख लुटले; पाच जण पोलिसांच्या ताब्यात

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री :
हमाली काम करणाऱ्याने एकाने मालकाचा घात केल्याचा प्रकार घडला होता. यात कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करून ५० लाख रुपयांची रक्कम लंपास केली होती. या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २० लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे.

कांदा व्यापारी समीर शेख व त्यांच्या बंधूवर अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला करत ५० लाखांची रोकड लंपास केल्याची घटना ७ सप्टेंबरला भर दिवसा कांदा मार्केटच्या समोर घडली होती. या हल्ल्यात व्यापारी शेख हे गंभीर जखमी झाले होते. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली होती. घटनेचे गंभीर्य बघता पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक दृष्ट्या तपास करत ४ आरोपी राहूरी येथून तर एका आरोपीला अहमदनगरमधून अटक केली आहे.

विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये हमालांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये मुबारक अत्तार, सुनील माळी,अक्षय बाचकर, मयूर गायकवाड, मनोज शिरसाठ यांचा समावेश आहे. तर मुबारक आत्तार हे व्यापारी शेख यांच्याकडे कामाला होता. मात्र दोघांमध्ये वाद झाल्याने व्यापारी शेख याने हमाल आत्तार याला कामावरून काढले होते. दरम्यान हमाल आत्तार आणि त्याचा मित्र हमाल संजय चव्हाण यांनी व्यापारी शेख यांना लुटण्याचा प्लॅन आखला. फरार असलेल्या सहकाऱ्यांना हाताशी धरून हल्ला चढवला असल्याचे कबूल केले आहे. यामध्ये पोलिसांनी ५ आरोपीना अटक केली असून फरार असलेल्या ५ जणांचा शोध पोलीस घेत आहे.

मुबारक गणीभाई आत्तार (वय ३४, रा.मुकूंदनगर), सुनिल छबु माळी (वय २२, रा.बारागाव नांदुर ता.राहुरी), अक्षय आण्णा बाचकर (वय २२, रा.गडदे आखाडा, ता.राहुरी), मयुर उर्फ भैय्या आनंथा गायकवाड (रा.राहुरी खुर्द, ता.राहुरी), मनोज सुंदर शिरसाठ (वय ३३, रा.राहुरी खुर्द ता.राहुरी, जि.अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सविस्तर असे की फिर्यादी कांदा व्यापारी शोएब अन्वर सय्यद हे व त्यांचा भाऊ समीर सय्यद असे ७ सप्टेेंबर २०२४ रोजी सकाळी १०.४५ वाजे दरम्यान कारने नेप्ती कांदा मार्केट येथे कांदा लिलावाकरीता घरून पैसे घेऊन जात असताना हॉटेल राजनंदिनी समोर आरोपींनी फिर्यादीच्या कारला धडक देऊन, कोयत्याने व लोखंडी रॉडने कारच्या काचा फोडल्या. दोघांवर कोयत्याने वार करून ५० लाख रूपये रक्कम बळजबरीने हिसकावून चोरुन नेली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस अणण्यासाठी सुचना दिल्या.

पोलिस निरीक्षक आहेर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/ तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अतुल लोटके, फुरकान शेख, प्रशांत राठोड, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, अमृत आढाव, शरद बुधवंत, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, विशाल तनपुरे, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, प्रमोद जाधव, अरूण मोरे अशांचे पथक नेमूण तपासासाठी पथकास रवाना केले. पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन, साक्षीदाराकडे विचारपुस करून, तपास पथकाने घटनाठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा नागेश संजय चव्हाण (रा. मोमीन आखाडा ता.राहुरी) याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी हे चोरी केलेल्या पैशाचे वाटप करण्यासाठी विळद घाट परिसरातील जाणाई तलाव येथे येणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने पथकाने जाणाई तलावाजवळ जाऊन खात्री केली. तेथे एक पे रिक्षा, दोन मोटार सायकलसह ९ ते १० इसम बसलेले व उभे असलेले दिसले. पोलिसांचे पथक पाहताच पाच जणांनी तेथून पळ काढला. तर पाच जणांना पोलिसांनी शिताफिने पकडले. नागेश संजय चव्हाण, अक्षय गोपाळे, सागर चव्हाण, अक्षय छबु साळवे, अंकुश नामदेव पवार हे आरोपी पळून गेले. आरोपींकडून २० लाख ५० हजार रूपये रोख रक्कम पाच लाख रुपयांची वाहने, मोबाईल असा एकुण २५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आरोपींना विश्वासात घेत सखोल विचारपूस केली असता आरोपी नागेश संजय चव्हाण व मुबारक गणीभाई आत्तार हे दोघे हमालीचे काम करतात. मुबारक आत्तार हे फिर्यादी यांचेकडे कामास असताना फिर्यादी व मुबारक यांचेमध्ये वाद झाल्याने मुबारक यास कामावरून काढुन टाकले होते. मुबारक व नागेश चव्हाण यांनी गुन्हयांचा प्लॅन तयार केला. प्लॅननुसार फिर्यादीला लुटले असल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...