spot_img
ब्रेकिंगविधानसभेच्या अनुषंगाने हाकेंचं जरांगेंवर टीकास्त्र; म्हणाले, 'मनोज जरांगेंची...'

विधानसभेच्या अनुषंगाने हाकेंचं जरांगेंवर टीकास्त्र; म्हणाले, ‘मनोज जरांगेंची…’

spot_img

पंढरपूर / नगर सह्याद्री –
मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. सध्या राज्यातील सर्वच मतदारसंघामध्ये त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ते या निवडणुकीमध्ये सर्व मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांचे टेन्शन वाढले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जहरी टीका केली आहे. ‘विधानसभा निवडणुका लढवण्याची मनोज जरांगेंची लायकी नाही.’, असं विधान त्यांनी केले आहे.

लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना सांगितले की, ‘मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचा मुद्दा कळलाच नाही. जरांगे हे निवडणुका लढू शकत नाहीत. त्यांची निवडणुका लढवाव्या इतकी हैसियत नाही. राजकारण आणि निवडणुका यांच्या बाहेर जरांगे यांना कुठलाही इंटरेस्ट नाही. त्यामुळे मनोज जरांगे हे निवडणुका लढवणार नाहीत.’, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

लक्ष्मण हाके हे आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच,’येत्या निवडणुकीत ओबीसी प्रश्नाबाबत ज्या नेत्यांनी पक्षांनी ओबीसी प्रश्नावर भूमिका घेतली नाही. अशा नेत्यांच्या आमदारकीच्या वाटा ओबीसी लोकांच्या वाड्या वस्त्यावरून जातात. त्यामुळे ओबीसी प्रश्नावर न बोलणाऱ्या नेत्यांना या निवडणुकीत आम्ही घरी बसवू.’ असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ! ‘लाडकी बहीण योजनेला’ स्थगिती, निधीही थांबवला; समोर आले कारण..

मुंबई / नगर सह्याद्री - राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही...

नगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले; कोण आहेत उमेदवार पहा…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री विधानसभा निवडणुकीसाठी धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास...

कुंटणखान्यावर छापा; प्रतिष्ठित व्यक्तींवर गुन्हा, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील राहुरी येथील न्यू भरत हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसायात...

कर्मचाऱ्यांनो कुणाचा प्रचार कराल तर…; आयुक्तांनी काय दिलाय इशारा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीच्या राजकीय कार्यक्रम व प्रचारात महापालिकेच्या अधिकारी व...