spot_img
अहमदनगरहमसे गुस्ताखी! 'भाई का फोन आयेगा, उठा ले'; अहिल्यानगर मधील व्यापाऱ्याला धमकी

हमसे गुस्ताखी! ‘भाई का फोन आयेगा, उठा ले’; अहिल्यानगर मधील व्यापाऱ्याला धमकी

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील व्यापाऱ्याचा दुचाकीवरून पाठलाग करत ‘भाई का फोन आयेगा, उठा ले’, असे म्हणत, तसेच मोबाईलवर ‘चंद रुपयो के लिये तुम अपनी जान दाव पर नही लगाओगे’, असा मेसेज पाठवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी व्यापारी किरण मोहनलाल राका (वय ५६, रा. अलायम बंगला, आदर्श कॉलनी, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राका यांचे जुना दाणे डबरा येथे दर्शन सेल्स नावाने बेकरी प्रॉडक्टच्या रॉ मटेरियल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे सहा कामगार आहेत. १४ डिसेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजता दुकान बंद करुन सर्जेपुरा चौक, अप्पू हत्ती चौक मार्गे घरी जात असतांना अप्पू हत्ती चौकाजवळ त्यांच्या दुचाकीचा दोघांनी पाठलाग करून त्यांना आवाज देऊन रस्त्यात थांबवले. दुचाकीवरील एकाने भाई का फोन आयेगा उठालो, असे म्हणत दोघे तेथून निघून गेले. त्यांच्या हातात नळकांडी सारखे काहीतरी होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १५ डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज आला.

‘देख कल गोली नही चलाई, अगली बार सिधे ठोक देंगे, इसे महज एक धमकी समझके हमे हलके मे लेगा, हमसे गुस्ताखी करेगा तो यकीनन जान से जाएगा, हमारे बंदो को अंदर करेगा, तो तुझे छोड देंगे क्या? वो तो आजकल मे बाहर होंगे, लेकीन तुझें जहाँनुम पहुचाकर ही रहेंगे, कबतक छुपेगा, कहातक भागेगा, पुलिस भी आखिर कब तक तुझको बचा लेगी? कही भी, कभी भी जहा मिला वही तेरी कबर खोद देगे, इस गलतफैमी मे बिलकुल भी मत रहना के पुलिस या कोई पॉलिटिशियन तुमको बचा लेगा, क्युंकी सब देखते रह जाएंगे और हमारी गोली तेरे अंदर होगी, हमे गोली चलाने पर मजबूर मत कर, वरना खून के आसू रोएगा ये हमारा वादा है, तेरे लिये बेहतर होगा के तू बिना किसी खून खराबे के हमारी बात मान और अपनी जान बचा, ये मोबाईल और सिम फर्जी है और आगे भी जो कूछ मिलेगा वो भी फर्जी होगा, इस लिये हम उम्मीद करते है के चंद रुपयो के लिये तुम अपनी जान दाव पर नहीं लगाओगे’, असा मेसेज आला. त्यानंतर त्याच मोबाईल नंबरवरुन फोन आला व त्यावर बोलणार इसमा ‘मेसेज पढा क्या, भाई का फोन आयेगा उठाव’, असे म्हणाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या संदर्भात पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना विचारले असता, तपास सुरू असून सीडीआर आल्यावर पुढील तपासाला दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कंटेनर चालकाचा प्रताप; दहा ते पंधरा गाड्यांना धडक, अनेकजण जखमी

पुणे / नगर सह्याद्री - चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरने दहा ते पंधरा...

मनपाचा ‘तो’ निर्णय अन्यायकारक! शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले, जनतेवर बोजा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी...

.. तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; अविनाश घुले यांचा मनपाला इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर शहरातील नागरिकांना रोज पाणी पुरवठा करावा आणि मगच पाणीपट्टीत वाढ...

कोरठण खंडोबा यात्रोत्सव उत्साहात; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

पारनेर | नगर सह्याद्री:- पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र...