spot_img
अहमदनगरगुरुजी तसलं वागणं बर नव्ह! विद्यार्थिनीशी नेमकं काय घडलं? केली निलंबनाची मागणी..

गुरुजी तसलं वागणं बर नव्ह! विद्यार्थिनीशी नेमकं काय घडलं? केली निलंबनाची मागणी..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील एका महाविद्यालयीन प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित प्राध्यपकास निलंबीत करावे , या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको अंदोलन करण्यात आले. संबंधित संस्थेच्या सचिवांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली जाईल, समितीच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल,असे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.

अकोले शहरातील संबंधित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग केल्याच्या आरोपावरुन हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ संबंधित प्राध्यापकाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. तेथून हा जमाव पोलीस ठाण्यात गेला. तेथे यासंबंधी निवेदन देण्यात आले व संबंधित प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर घोषणा देत जमाव महात्मा फुले चौक येथे गेला. काही काळ रस्त्यावरील दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे शहर बंद सारखी स्थिती निर्माण झाली होती.

महात्मा फुले चौक येथे काही वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत संस्था पदाधिकारी व आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला. यावेळी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. संबंधित संस्थेच्या सचिवांनी या आरोपांबाबत त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून चौकशीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये बंद घर फोडले; अडीच लाखांचे दागिने लांबविले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - श्रीकृष्णनगर, केडगाव येथील प्लॉट क्रमांक ३० येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी...

धक्कादायक; बँक कर्मचार्‍याने १२ तोळे सोने लांबविले, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : नगरमध्ये बँक कर्मचार्‍यांने १२ तोळे सोने लंपास केल्याची प्रकार उघडकीस...

दोन लेकरांसह आईची विहिरीत उडी; तिघांचाही मृत्यू, नगरमधील घटना

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील धक्कादायक घटना जामखेड | नगर सह्याद्री रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जामखेड तालुयातील नायगाव...

बोगस मतदारांच्या आरोपावरून विखे-थोरात भिडले, काय म्हणाले पहा

शिर्डी | नगर सह्याद्री बोगस मतदानाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले...