Maharashtra Politics: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेची माहिती उजेडात आली आहे. प्राथमिक सर्व्हेनुसार राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या सर्व्हेनुसार सर्वाधिक जागा ८०-८५ जागा काँग्रेसला मिळण्याचा अंदाज आहे.तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 55 ते 60 जागा मिळण्याचा संभव आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव गट) ला 30 ते 35 जागा मिळू शकतात.
शिवसेना शिंदे गटाला ३०-३२ तर अजित पवारांच्या पक्षाला ८-९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या या प्राथमिक सर्व्हेत महाविकास आघाडीची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.याशिवाय, महायुती-महाविकासआघाडीच्या राजकारणात नवा प्रयोग सुरू झाला आहे.आज मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर आणि इतर छोट्या पक्षांची तिसरी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.भाजपने ‘मिशन 125’ अंतर्गत 50 जागा निश्चित केल्या आहेत आणि इतर 75 जागांसाठी विशेष रणनीती आखली आहे. राज्यातील बड्या नेत्यांवर 7-8 मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने या नेत्यांचे दौरे सुरू केले असून, निवडणूक तयारी गतीला आली आहे.