spot_img
ब्रेकिंगविमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे पाटलांचा मोठा निर्णय; वाढदिवस...

विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे पाटलांचा मोठा निर्णय; वाढदिवस…

spot_img

 

लोणी / नगर सह्याद्री
अहमदाबाद येथे घडलेल्या विमान अपघाताच्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यानी जाहीर कार्यक्रम सत्काराचे नियोजन न करण्याचे आवाहन केले आहे.

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात मंत्री विखे पाटील यांनी म्हणले आहे की,अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या घटनेत भाजपाचे जेष्ठ नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २६५ प्रवाशांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आहे.यामध्ये महाराष्ट्रातील दहा व्यक्तीचा समावेश असून कधीही भरून न येणारी हानी असल्याने संपूर्ण देश या घटनेन हादरला आहे.

घटनेतील सर्व मृत नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति सर्वाच्या संवेदना आहेतच.या कठीण संकटातून सर्व कुटूबियांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी ही प्रार्थना आहेच.

आशा सर्व परीस्थितीत कोणतेही सार्वजनीक तसेच सत्कार सोहळे आयोजित करणे उचित होणार नाही.त्यामुळे आपण वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी सत्काराचे कोणतेही साहीत्य घेवून येवू नये असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

सामाजिक दायित्व म्हणून समाजातील गरजू, निराधार एकल महीलांना मदत तसेच विद्यार्थ्याना शालेय साहीत्य वाटप करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाला पाठबळ म्हणून प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांवर वृक्ष संर्वधानची चळवळ म्हणून एक पेड माँ के नाम उपक्रम राबविण्याचे मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...