मुंबई | नगर सह्याद्री
जीएस महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या 1 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. गितांजली शेळके यांच्या सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनेला कपबशी तर सुमनताई शेळके यांच्या पॅनेलला रिक्षा चिन्ह मिळाले आहे. तर अपक्षांना नारळ, प्रेशर कुकर, छत्री, पणती, टीव्ही रिमोर्ट असे चिन्ह मिळाले आहेत. जीएस महानगर बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. 19 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनेलचे अनुसुचित जाती जमाती मतदारसंघातून संतोष भाऊराव रणदिव बिनविराध झाले आहेत. आता 18 जागांसाठी 40 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
गितांजली शेळके यांच्या पॅनेलला कपबशी हे चिन्हे मिळाले आहे.
उमेदवार पुढील प्रमाणे – सर्वसाधारण मतदारसंघ – आडसूळ सचिन सिताराम, ढोले रविंद्र दत्तात्रय, गुंजाळ गणेश सावकार, कवाद भास्कर बाबाजी, खणकर सतीश आनंद, खोसे कुंदा भास्कर, खोसे मंगेश नारायण, कोठावळे, श्रीधर कोंडीराम, लंके बबन भाऊ, पठारे संतोष किसन, शेळके गितांजली उदय, शिंदे पांडुरंग विष्णु, शिंदे शंकर पांडुरंग, थोरात मंगलदास भाऊसाहेब.
महिला राखीव मतदारसंघ
शेळके गितांजली उदय, वाढवणे छाया रामदास.
इतर मागास वगय मतदारसंघ
थोरात भिवाजी भागुजी
भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघ
पालवे विलास दगडू
सुमनताई शेळके यांच्या पॅनेलला रिक्षा हे चिन्हे मिळाले आहे.
उमेदवार पुढील प्रमाणे – सर्वसाधारण मतदारसंघ – भगत विष्णु सखाराम, भोसले किसनराव शंकरराव, चत्तर विजय नानाभाऊ, डेरे गितांजली राजेश, डेरे राजेश चंद्रकांत, ढोमे सुरेश होनाजी, हाडवळे भानुदास ज्ञानदेव, लावंड शिवाजी सदाशिव, पाटील योगेश पांडुरंग, राऊत अर्जुन किसन, शेळके स्मिता गुलाबराव, तांबे नंदकुमार नाथा, वरखडे बबुशा बाबुराव,
महिला राखीव मतदारसंघ
शेळके स्मिता गुलाबराव, शेळके सुमन गुलाबराव
इतर मागास वगय मतदारसंघ
कुऱ्हे मंगेश ज्ञानदेव
भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघ
गर्जे प्रविण कारभारी
अपक्षांना मिळालेली चिन्ह
सर्वसाधारण मतदारसंघात कावरे बबन राधाकृष्ण यांना पणती, खाणकर परशुराम मारुती यांना टिव्ही रिमोट, वराळ शिवाजीराव गणपत यांना छत्री, महिला राखीव मतदारसंघात डेरे गितांजली राजेश यांना प्रेशर कुकर, इतर मागासवगय राखीव मतदारसंघात खोसे खंडु मालक यांना नारळ हे चिन्हे मिळाले आहे.