spot_img
अहमदनगरमर्चंटस बॅंकेचा ग्राहकांना मोठा दिलासा

मर्चंटस बॅंकेचा ग्राहकांना मोठा दिलासा

spot_img

अहमदनगर मर्चंटस बॅंकेच्या चितळे रोड शाखेत कॅश डिपॉझिट मशीनचा शुभारंभ / अधिकाधिक जलद आणि सुरक्षित बॅंकिंग सेवा देण्यावर मर्चंट बॅंकेचा भर : हस्तीमलजी मुनोत
अहमदनगर / नगर सह्याद्री :
अहमदनगर मर्चंटस बॅंक सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करताना अत्याधुनिक बॅंकिंग सेवेचा विस्तार करत आहे. एटीएम मशीन नंतर आता कॅश डिपॉझिट मशीन बॅंकेने कार्यान्वित केली आहे. यात खातेदारांना पैसे काढता येतील तसेच पैसे भरताही येणार आहेत. ही सेवा सुटीचे दिवस धरून दररोज २४ तास उपलब्ध असल्याने ग्राहकांचा भरणा करण्यासाठी बॅंकेत येण्याजाण्याचा वेळ वाचणार आहे. ग्राहकांना अधिकाधिक जलद आणि सुरक्षित बॅंकिंग सेवा देण्यावर बॅंकेने कायम भर दिला आहे, असे प्रतिपादन अहमदनगर मर्चंटस बॅंकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांनी केले.

अहमदनगर मर्चंटस बॅंकेच्या चितळे रोड शाखेत बॅंकेच्या रिसायकलिंग ( कॅश डिपॉझिट) मशीनचा शुभारंभ हस्तीमलजी मुनोत यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी मशीन द्वारे खात्यात सर्वप्रथम रक्कम जमा करणारे बॅंकेचे खातेदार एस. जी. कायगांवकर ज्वेलर्सचे संचालक सागर कायगांवकर, व्हा.चेअरमन अमित मुथा, संचालक आनंदराम मुनोत, किशोर मुनोत, संजय बोरा, मीनाताई मुनोत, सी.ए. मोहन बरमेचा, संजीव गांधी, सीईओ सुनील पुराणिक, जॉइंट सीईओ नितीन भंडारी, प्रसाद गांधी, शाखाधिकारी जाधव मॅडम आदी उपस्थित होते.

हस्तीमलजी मुनोत पुढे म्हणाले, चितळे रोड शाखेत पहिले मशीन कार्यान्वित केले असून येत्या काळात नगर शहरातील इतर शाखेतही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. या मशीनमध्ये १००, २००, ५०० च्या नोटा जमा करण्याची सोय आहे. एका वेळी ग्राहकांना ४९ हजार ५०० रूपये इतकी रक्कम जमा करता येईल.‌ डेबिट कार्ड नसलेले ग्राहक आपला १५ अंकी खाते क्रमांक टाकून सेवेचा लाभ मिळवू शकतील. मर्चंटसच्या खातेदारांसाठी त्यांच्या मर्चंटस बॅंकेतील कोणत्याही शाखेतील खात्यासाठी ही सेवा निःशुल्क उपलब्ध आहे. इतर बॅंकेच्या खात्यातही या मशिनद्वारे पैसे जमा करता येणार आहेत, त्यासाठी चार्जेस आकारले जातील.

सागर कायगांवकर म्हणाले, अत्याधुनिक डिजिटल बॅंकिंग सेवा देण्यात मर्चंटस बॅंकेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. कॅश डिपॉझिट मशीनमुळे आता रोकड बाळगण्याची गरज राहणार नाही. सुटीच्या दिवशीही बॅंकेत भरणा करता येणार आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात बॅंकेने ग्राहकांना आणखी एक चांगली भेट दिली आहे. शेवटी व्हा. चेअरमन अमित मुथा यांनी आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...