spot_img
ब्रेकिंगलाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

spot_img

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. परंतु आता लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार मिळणार याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. शिर्डीतील नागरी सत्कार कार्यक्रमात विखे पाटलांनी हे विधान केलं आहे. युतीचं सरकार लाडक्या बहिणींना कधीही दूर करणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

विखे पाटील म्हणाले, आमच्या लाडक्या बहिणी कारभारणी झाल्या आहेत. हे विरोधी लोकं बोलायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे. पण योजना बंद झाली का? चालू आहे का बंद आहे? आता तुमचा जानेवारीचा हप्ता येईल. मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे १५०० चे २१०० रुपये होतील. युती सरकारचा हा शब्द आहे तुम्हाला की, आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कधी दूर करणार नाही, हे मला आवर्जुन सांगितलं पाहिजे”

दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरुन राज्यात सध्या उलट सुलट चर्चा सुरु आहेत. म्हणजेच सरकारनं आता या योजनेच्या पडताळणीला सुरुवात केल्यानंतर त्यातून लाखो अर्ज बाद झाले आहेत. तसंच ज्या निकषात न बसणाऱ्या अपात्र महिला आहेत, त्यांनी या योजनेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं जात आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी सरकार सांगितलं होतं की अपात्र असलेल्या कोणाचेही पैसे परत घेणार नाही. पण आता पुन्हा सरकारनं पवित्रा बदलला असून ज्यांनी बेकायदा पद्धतीनं या योजनेचा लाभ घेतला त्यांचे पैसे परत घेणार असल्याचं म्हटलं आहे.

तसंच निवडणुकीपूर्वी पुन्हा महायुती सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचं मानधन १५०० रुपयांवर २१०० रुपये करणार असल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण आता सरकार सत्तेत येऊन दोन महिने झाले तरी याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळं २१०० रुपये हप्ता कधी होणार? असा सवाल लाभार्थी महिला विचारत आहेत. पण या वचनाची पूर्तता करण्यासाठी हा विषय अधिवेशनात मांडून त्यावर चर्चा करुन अर्थसंकल्पात त्याची तरतूद करुन पुढे त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं अर्थमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता विखे पाटील यांनी सांगितलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भातोडी सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर; तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पूर्ण

नऊ पैकी सात मते अविश्वासाच्या बाजूने  अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- कामाचा गैरवापर व पदाचा अनियमित वापर...

म्हसणे फाटा टोलनाका ग्रामस्थांनी केला बंद; कारण काय?

बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन । पो. नि. दिवटे यांची यशस्वी मध्यस्थी सुपा । नगर सहयाद्री:-...

छत्तीसगडमध्ये १९ नक्षलवादी ठार!; चकमकीत सुरक्षा दलाला यश

Naxal Encounter: छत्तीसगडमध्ये सोमवारी नक्षलवादी आणि जवान यांच्यामध्ये चकमक झाली. यामध्ये १९ नक्षलवादी मारले...

खुनाच्या गुन्हयातील आरोपी जेरबंद; रेल्वे स्टेशनवर ‘असा’ लावला सापळा

श्रीगोंदा । नगर सहयाद्री :- तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला...