spot_img
अहमदनगरकोतवाली पोलिसांची मोठी कामगिरी; 'ते' अट्टल चोर गजाआड

कोतवाली पोलिसांची मोठी कामगिरी; ‘ते’ अट्टल चोर गजाआड

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

मोटार सायकल चोरून त्यांच्या पार्टची विल्हेवाट लावणार्‍या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोतवाली पोलिसांच्या पथकांने ही कारवाई केली. आरोपींकडून पोलिसांनी सात मोटार सायकल हस्तगत केल्या असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली आहे.

रोहित आप्पासाहेब शिरोले, यश प्रकाश ओहळ, करण कैलास पवार, इम्राण सलिम शेख अशी अटककरण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीकडून २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई दिनांक १८ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

दरम्यान गोपीनाथ तुकाराम घुसाळे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असतांना कोतवाली पोलिसांना माहिती समजली की, गाड्यांचे पार्ट सुट्टे करून त्यांची विक्री होती असल्याचे समजले.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत आरोपींना माळीवाडा परिसरात असल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवेंद्रजी, सरकारचे हजारो कोटी पाण्यात जाणार; नगर- कल्याण हायवेचे काम अतिशय निकृष्ट

नगर- कल्याण हायवेचे काम अतिशय निकृष्ट | अधिकाऱ्यांसह- लोकप्रतिनिधींचे अर्थपूर्ण दुर्लक्ष पेवर मशिनऐवजी मजुरांकडून...

‘विखे पाटील स्पोर्ट्सच्या दिव्यांग खेळाडूंची चमकदार कामगिरी’

राष्ट्रीय स्पर्धेसाठी दोन खेळाडूंची निवड; जलतरण व पॉवरलिफ्टिंगमध्ये यश अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्पेशल ऑलिंपिक भारतच्या...

पाकव्याप्त काश्मीरचं अस्तित्व नेहरुंमुळेच; शाहांनी फोडलं खापर; काय म्हणाले पहा…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या...

थार गाडीत गवसलं घबाड?; ‘या शिवारात कारवाई, पण..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- भारतीय चलनाच्या 500 रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा...