पारनेर / नगर सह्याद्री:-
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत तालुक्यातील कर्जुले हरेश्वर गावात ६१ घरकुले मंजूर झाली.गावातील ६१ लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्याचा आणि लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्याचा मध्यवर्ती कार्यक्रम काल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सरपंच सौ. सुनीताताई मुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक व देवस्थान ट्रस्ट सचिव एकनाथ दाते सर, देवस्थान अध्यक्ष शिवाजी शिर्के, उपाध्यक्ष दत्तूशेठ आंधळे, माजी सरपंच संजीवनी आंधळे, उप सरपंच मिनिनाथ शिर्के यांच्या लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व लाभार्थ्यांचे खात्यात एका क्लिकद्वारे बटन दाबले आणि तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा झाली.
मिळालेल्या अनुदानाचा चांगला वापर करा, चांगल्या गुणवत्तेचे घर बांधा,” अशा प्रकारचा सल्ला सरपंच सौ. सुनीता मुळे यांनी दिला. घरकुल गरजू लाभार्थ्यांपर्यंत सरकारचा निधी (कुणाही मध्यस्थाशिवाय) थेट भेटला असून चांगले घर बांधा असा सल्ला यावेळी देवस्थान अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी दिला.