मुंबई। नगर सहयाद्री:-
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक मोठा निर्णय महायुती सरकारनं निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे 31 मेपर्यंत हटवण्यात येणार असल्याचे आदेश दिले आहेत.
महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर शिवप्रेमी व हिंदुत्त्ववादी संघटनांकडून राज्यातील गड किल्ल्यांवर वर्षानुवर्षे असलेली अतिक्रमणं हटवण्याबाबतची सातत्याने करण्यात येत होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता गड किल्ल्यांवरील अतिक्रमणाविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे 31 मेपर्यंत हटवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
31 जानेवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना गड किल्ल्यांवरील असलेल्या सर्व अतिक्रमणांची यादी सादर करायची आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्यासंदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र 47 आणि 62 राज्य संरक्षित किल्ले महाराष्ट्रात सध्या आहेत.किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची एक समिती नियुक्त करण्यात आली आहे.