spot_img
अहमदनगरधान्य टिकवण्याच्या पावडरने घेतला दोन बालकांचा जीव; आईची प्रकृती चिंताजनक

धान्य टिकवण्याच्या पावडरने घेतला दोन बालकांचा जीव; आईची प्रकृती चिंताजनक

spot_img

संतप्त ग्रामस्थांचे टाकळी ढोकेश्वर येथे ठिय्या आंदोलन
पारनेर | नगर सह्याद्री

नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी येथील धरमवस्तीवर बाजरी धान्य टिकवण्यासाठी वापरलेल्या सेल्फॉस पावडरच्या विषारी वासाने दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गेल्या रविवारी (२९ सप्टेंबर) रोजी सकाळी घडली. या घटनेत मृत मुलांची आई सोनाली विठ्ठल धरम (वय-२५) या देखील बेशुद्ध झाल्या असून, त्यांच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत मुलांमध्ये हर्षल विठ्ठल धरम (वय पाच महिने) आणि नैतिक विठ्ठल धरम (वय पाच वर्षे) यांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, शेतकरी विठ्ठल धरम यांनी बाजरीला कीड लागू नये म्हणून गुरुवारी रात्री धान्याच्या पोत्यात सेल्फॉस पावडर ठेवली होती. शुक्रवारपासून या कुटुंबातील दोन्ही मुलांना आणि आईला मळमळ, उलट्या यांसारख्या तक्रारी सुरू झाल्या. रविवारी पहाटे प्रकृती खालावल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन्ही मुलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहांवर उत्तरीय तपासणी करण्यात आली.

या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी आणि ग्रामस्थांनी रविवारी दुपारी ०४:३० वाजता नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको केला. त्यानंतर टाकळी ढोकेश्वर येथील कृषी केंद्रासमोर एक तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक समीर बारवकर, सपोनि नितीन खंडगळे, साहायक फौजदार गणेश डहाळे, पो. कॉ. मच्छिंद्र खेमनर, सागर धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देत नातेवाइकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेने धान्य साठवणुकीसाठी वापरल्या जाणार्‍या रासायनिक पावडरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कृषिसेवा केंद्रासमोर ठेवले मृतदेह
मृत नैतिक व हर्षद यांच्यावर ढोकी ग्रामस्थांनी शोकाकुल वातावरणात रविवारी (दि. २८) सायंकाळी अंत्यसंस्कार केले. त्या पूर्वी ग्रामस्थांनी दोन्ही चिमुरड्यांचे मृतदेह कीडनाशके घेतलेल्या कृषिसेवा केंद्राच्या दुकानासमोर ठेवून आक्रोश व संताप व्यक्त केला. या घटनेच्या चौकशीची मागणी केली. पारनेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर व दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या आश्वासनानंतर या दोन चिमुरड्यांवर शोकाकुल वातावरणात त्यांच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पारनेर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदिवण्याचे काम सुरू होते.

मृतदेहासह भर पावसात ठिय्या
चिमुकल्यांच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर संतप्त नातेवाइकांनी मृतदेहासह भर पावसात एक तास टाकळी ढोकेश्वर येथील कृषिसेवा केंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले. दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी गुन्हा दाखल करण्याची ग्वाही देत, चर्चेअंती हे आंदोलन मागे घेण्यात आले.

धान्याला कीड लागू नये, यासाठी ’सेलफॉस’ पावडर वापरली जाते. ही पावडर अतिविषारी असून अल्युमिनियम फॉस्पेट हा घटक असल्याने वापर झाल्यानंतर त्याचा रासायनिक गॅस तयार होतो. या पावडरीवर बंदी नाही. ती कशी वापरायची, यासंदर्भातील सूचना पाकिटावर दिल्या आहेत.
– गजानन घुले, तालुका कृषी अधिकारी, पारनेर.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“राहुल गांधींना गोळ्या घालू…” ; भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त विधान, काँग्रेसकडून थेट अमित शहांना पत्र

नवी दिल्ली / वृत्तसंस्था काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे माजी नेते आणि...

एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक; नांदेड, वाशिममध्ये मोर्चा

नांदेड / नगर सह्याद्री - मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे....

पारनेरमध्ये अतिवृष्टीमुळे नऊ मेंढ्या मृत्युमुखी, नेमकं काय घडलं पहा

पारनेर | नगर सह्याद्री गेल्या पंधरा दिवसांपासून पारनेर तालुयात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, ग्रामीण...

ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्तांना मदत, कर्जमाफी करावी; संभाजी ब्रिगेडची मागणी

पालकमंत्र्यांच्या दालनाबाहेर जागरण गोंधळ अहिल्यानगर | नगर सह्याद्री महाराष्ट्रात काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे महाभयंकर पूरस्थिती...