जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेड पोलीसांनी दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. वैभव बाबासाहेब खेडकर (वय 35) आणि सुधीर शहाजी सुरवसे (वय 32) अशी आरोपीची नावे आहे. जामखेड पोलिसांनी त्यांच्याकडून दहा लाख पस्तीस हजार रुपये किंमतीच्या 36 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान, चोरट्यांनी मोटारसायकली चोरीच्या ठिकाणाहून ओळखीच्या लोकांना स्वस्त किंमतीत विकल्याचे उघड झाले आहे. त्यांनी फायनान्स कंपनीतील कामगार असल्याचे सांगून चोरलेल्या मोटारसायकली विकल्या.
पोलिसांनी आरोपींच्या चौकशीतून 36 चोरलेल्या मोटारसायकलींचा शोध घेतला, ज्यात 16 मोटारसायकलींच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
दारू व चैन करण्यासाठी पैशाची गरज भागविण्यासाठी जामखेड, श्रीगोंदा कर्जत, संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यातून गर्दीच्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.
दोन्ही आरोपींकडून जामखेड पोलीसांनी दहा लाख पस्तीस हजार रुपये किंमतीच्या 36 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. याबाबत पोलिसांकडून सापडलेल्या मोटारसायकल मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
सदरची कारवा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनि वर्षा जाधव, जामखेड शहर बीटाचे अंमलदार पोहेकॉ/प्रविण इंगळे, पोना.संतोष कोपनर, पोना.जितेंद्र सरोदे, पोकॉ.प्रकाश मांडगे, पोकॉ.कुलदिप घोळवे, पोकॉ.देविदास पळसे, पोकॉ.ज्ञानेश्वर बेल्हेकर, पोकॉ.भगिरथ देशमाने, पोकॉ.जिब्राईल शेख व सायबर सेलचे पोकॉ.नितीन शिंदे व पोकॉ.राहुल गुंडु यांनी केली आहे.