spot_img
ब्रेकिंगजीआर मुळे सर्व मराठ्यांचा फायदा; कसे ते पहा, कोण काय म्हणतय पहा...

जीआर मुळे सर्व मराठ्यांचा फायदा; कसे ते पहा, कोण काय म्हणतय पहा…

spot_img

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री
हैद्राबाद गॅझेटच्या नोंदी लक्षात घेऊन मराठा समाज ओबीसीत जाणार आहेत. सरकारने काढलेल्या जीआर मुळे सर्व मराठे ओबीसीत जाणार म्हणजे जाणार, असा विश्वास व्यक्त करत काही लोकांचे ऐकून गैरसमज करुन घेऊ नका असं सांगत त्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

गेल्या ५ दिवसांपासून आझाद मैदानात मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांनी मंगळवारी आंदोलन संपवले. सरकारकडून एक जीआर काढण्यात आला. यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण संपवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेसी रुग्णालयात उपचार सुरू असून तेथून आज पत्रकार परिषद घेत सर्वांना पुन्हा संबोधित केले.

मराठ्यांनी जीवाची बाजी लावली. या लढ्याला जे यश मिळालं ते सगळं यश माझ्या मराठा बांधवाचं आहे, मी मात्र नाममात्र आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, त्यात तिळमात्रही शंका नाही, कोणी शंका घेऊही नका. ज्यांच्या नोंदी नाहीत, म्हणून तर गॅझेटिअर लागू करायचं आहे. त्याचा जीआर निघणं खूप आवश्यक होतं.
७५ वर्षात हक्काचे गॅझेटियर असून सरकारने एक ओळही लिहिली नव्हती. मात्र आता समाजाने संयम ठेवावा, कोणाही विदुषकाचे, अविचारी माणसाचे ऐकू नका, संयम, विश्वास ढळू देऊ नका असा सल्ला मनोज जरांगे यांनी दिला.

काहींचं पोट दुखत होता कारण त्यांना ज्या आरक्षणावर राजकारण करायचं होतं, जीवन पूर्ण जगत होते, ते पूर्ण कोलमडायला आलं आहे. ज्याच्या जीवावर राजकारण करायचे होते ते त्यांच्या हातून गेलं आहे. मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणावाचून राहणार नाही. पक्कं डोयात ठेवा आणि आनंदी रहा. काही लोकांचे ऐकून गैरसमज करुन घेऊ नका, त्याने आपलं भलं होणार नाही, असं जरांगे म्हणाले.

ओबीसी समाजासाठीही उपसमिती स्थापना
मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी समाजासाठीही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला होता. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू कऱण्यात आली होती. छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, हाके, परिनय फुके यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारकडून उपसमितीची स्थापना करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठीच्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यभरातील ओबीसी समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ओबीसीचे आरक्षण संपल्याची भावना हाकेंकडून व्यक्त करण्यात आली होती. तर आम्हाला वाटेकरू नको आहेत, आम्ही कोर्टात जाणार आहे, अशी थेट भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली होती. मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाणेही टाळलं होतं. ओबीसीकडून राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. ओबीसीचा हा रोष पाहता राज्य सरकारकडून उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असा शब्द दिला होता.

जीआर म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पुसलेली पान ः कोळसे पाटील
मंगळवारी काढलेला जीआर म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पुसलेली पान आहेत, असं मतं माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. मी १००% खरं बोलून टिकेचा धनी व्हायला तयार आहे. डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढणं म्हणजे काय हे मला आता समजलं. इतया मोठ्या आंदोलनातून आपल्याला काय मिळालं? मी जरांगे पाटलांना फोन करून रडून सांगितलं होतं तुम्ही हे बरोबर करत नाहीत, यामध्ये तुझ्याही तब्येतीचं नुकसान होईल आणि मराठ्यांचा देखील अतोनात नुकसान होणार आहे. आज जे सरकारने तुम्हाला कबूल केला आहे ते कायद्याच्या कोणत्याच कसोटीमध्ये बसणार नाही. हा जीआर पाहून मी हतबल झालो. असं बी जी कोळसे पाटील म्हणाले आहेत. फक्त बी.जी कोळसे पाटीलच नाही तर मराठा राज्य समन्वयक योगेश केदार आणि ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांनी देखील अशाच पद्धतीचा संशय या सरकारच्या जीआर वर व्यक्त केला आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा युद्धात जिंकलो मात्र तहात हरलो अशी भावना निर्माण व्हायला लागली आहे.

लेकराला पुन्हा उपोषण करायला लावू नका; जरांगेंच्या मातोश्रींना अश्रू अनावर
मनोज जरांगे पाटील यांना आता उपोषण करायला लावू नका. त्यांनी लय उपोषणं केली आहेत, आता अवसान राहिले नाही. मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा अन् महाराष्ट्रातील सर्वांना आरक्षण मिळवून दिले. माझ्या लेकराला पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ सरकारने आणू नये. माझ्या लेकाने २५ वर्षे आंदोलन केले. उपोषण केले. सरकारने आरक्षण द्यावे, असे मनोज जरांगे पाटील यांच्या मातोश्री म्हणाल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या मातोश्री आरक्षणाच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर भावूक झाल्या होत्या.

सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार ः सदावर्ते
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने मोठा विजय मिळवला आहे. आझाद मैदानातील आंदोलनाची सांगता झाली असून, सरकारने जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याच्या मागणीला मान्यता मिळाल्याने मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे देखील मागे घेतले जातील, असे आश्वासन सरकारने दिले आहे. मात्र अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेत कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायचे असतील तर इतर सर्वच आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

जीआरचा टाचणी एवढाही फायदा होणार नाही
सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या जीआरचा टाचणी एवढाही फायदा आणि उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही नवीन मिळालं नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे येऊन या जीआरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे, असंही विनोद पाटील म्हणाले आहेत. तसेच त्यांनी १०० पैकी या जीआरला मायनस झिरो मार्स देईल, असं देखील म्हटलं आहे.

सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद, भुजबळ नाराज, विखे पाटील म्हणाले…
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटीयरनुसार कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचा आणि सातारा गॅझेटीयरच अभ्यास करून एक महिन्यात त्यावर निर्णय घेणार असल्याचा मंगळवारी सरकारने अध्यादेश काढल्यानंतर मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाज हा आरक्षणासाठी लढा देत होता. काल फडणवीस सरकारने 9 पैकी 6 मागण्या मान्य केल्या. यानंतर मनोज जरांगे यांनी देखील उपोषण सोडत सरकारचे आभार मानले. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी यावर नाराजी व्यक्त करत ओबीसी आरक्षणाला धक्का बसल्याचे सांगत यावर नाराजी व्यक्त केली. यावर मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेपाटील यांनी पलटवार करत भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. भुजबळ यांना काहीतरी गैरसमज झाला आहे. कुठेही ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाहीये. त्यामुळे विनाकारण गैरसमज करू नये जे वास्तव आहे त्या स्वीकारले पाहिजे,आम्ही काय कोणाचे आरक्षण काढून घेत नाही.किंबहुणा गरीब आणि वंचित मराठा समाजाला न्याय देण्याचीच सरकारची भूमिका आहे असे विखे पाटील म्हणाले.

ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, भुजबळांची नाराजी दूर करणार – एकनाथ शिंदे
ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. भुजबळ नाराज असतील, तर त्यांना समजावून सांगू. छगन भुजबळ यांची नाराजी दूर करणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणाचा GR फाडला, OBC नेते आक्रमक, आता राज्यव्यापी आंदोलन

पुणे / नगर सह्याद्री - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर...

संयमाने परिस्थिती हाताळत, अभूतपूर्व पेचातून मार्ग काढत कसोटीस उतरलेले संयमी नेतृत्व विखे पाटील खरेखुरे वास्तववादी संकटमोचक!

सारिपाट / शिवाजी शिर्के काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील उपोषणात गिरीष...

मावा अड्ड्यावर छापा; एलसीबीची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत मावा अड्डयावर छापा...

जादा परताव्याचे आमिष; १.६० कोटींची फसवणूक, १५ आरोपी, पोलिसांनी केले असे…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये इनफिनाईट बिकन इंडिया प्रा. लि. आणि ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि....