spot_img
महाराष्ट्रबारस्कराचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप

बारस्कराचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप

spot_img

जालना / नगर सहयाद्री : मनोज जरांगे पाटील यांनी अजय बारस्कर महाराज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर घणघत केला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, अजय बारसकर हा महाराज वगैरे नाही. त्याच्या गावातील लोक बारसकर याने महिलांवर बलात्कार केल्याचे सांगतात.

एका बलात्काराच्या प्रकरणात तो अडकला होता, ते प्रकरण सरकारकडून दाबले गेल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. आता हेच प्रकरण काढत बारसकर याला माझ्याविरोधात बोलण्याची धमकी दिली गेली आहे. तू जरांगेंविरोधात बोल नाहीतर तुझं प्रकरण उघड करु, अशी धमकी दिली गेल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. अंतरवाली येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजय बारसकर बच्चू कडू यांच्यासोबत यायचा. त्याला विकत घेतले गेले आहे. अनेक भानगडी केल्या आहेत. त्याने एका संस्थानाच्या नावाखाली लोकांकडून ३०० कोटी जमा केले होते. दुसऱ्या गावात भिशीचे पैसे घेऊन तो पळाला होता. आता तो मरणार आहे. फक्त त्याला तुकाराम महाराजांचे नावाखाली सहानुभूती घेऊन मरायचे आहे, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.

मी उपोषणाला बसलो होतो तेव्हा मी माझ्या तंद्रीत होतो. तेव्हा चिडचिड होत होती, त्यात मी काही बोलून गेलो असेन तर तुकाराम महाराजांसमोर नाक घासायला तयार आहे. आंदोलन संपल्यानंतर त्याचा पश्चाताप करेन. सरकार, शिंदे साहेबांचा प्रवक्ता आणि बारसकरच्या पाठी जो कोणी बडा नेता आहे, त्याने बारसकरची साथ दिली तर तुमच्या पक्षाचे वाटोळे होईल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...