मुंबई | नगर सहयाद्री
महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. योजनेला एक वर्ष पूर्ण होत असताना राज्यभरात हजारो महिलांचे अर्ज सरकारने बाद केले आहेत. यामुळे या महिलांना आता योजनेअंतर्गत मिळणारे १५०० रुपये मिळणार नाहीत.
८०,००० पेक्षा अधिक अर्ज बाद:
सध्याच्या आकडेवारीनुसार सुमारे ८०,००० महिलांचे अर्ज विविध कारणांनी बाद करण्यात आले आहेत. त्यामध्ये उत्पन्न मर्यादा ओलांडणाऱ्या महिलांचा समावेश आहे. आयकर विभागाकडून सुरू असलेल्या पडताळणीत असे निष्पन्न झाले की, अनेक महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
जिल्हानिहाय अर्ज बाद झाल्याची माहिती:
जालना: तब्बल ५७,००० अर्ज बाद. एकूण ५.४२ लाख अर्जांपैकी मोठा टक्का अपात्र ठरला.
नागपूर: सुमारे ३०,००० अर्ज प्राथमिक पडताळणीत बाद.
अमरावती: २१,००० अर्ज अपात्र.
यवतमाळ: २७,००० अर्ज बाद.
कोण होतात अपात्र?
सरकारने काही स्पष्ट निकष ठरवले असून त्यात बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो:
ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक आहे
आयकर भरतात
सरकारी कर्मचारी आहेत
इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत
अशा महिलांचे अर्ज पडताळणीदरम्यान बाद करण्यात येत आहेत.
पुन्हा पडताळणी सुरु
लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेसाठी अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु असून चुकीच्या माहितीवर आधारलेले अर्ज बाद करण्यात येत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी योग्य कागदपत्रे सादर करावीत, असा सरकारचा संदेश आहे.