spot_img
ब्रेकिंगलाडक्या बहिणींबद्दल सरकाराचा मोठा निर्णय, 'काही महिलांना दोन वेळा...'

लाडक्या बहिणींबद्दल सरकाराचा मोठा निर्णय, ‘काही महिलांना दोन वेळा…’

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“लाडकी बहिण योजनेच्या मूळ जीआरमध्ये आम्ही कोणतेही बदल करत नाही. स्थानिक प्रधानाकडून तक्रारी आल्या आहेत. ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं आहेत, त्यांची पडताळणी होणार आहे. सरसकट पडताळणी होणार नाही. ज्यांच्या बाबतीत तक्रारी आल्या आहेत त्यांची पडताळणी होणार आहे. काही तक्रारी आम्हाला लाभार्थी महिलांकडून प्राप्त झाल्या आहेत,” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

“लाडकी बहीण योजनेसंदर्भात आम्हाला एक ते दीड महिन्यात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आम्ही या सर्व तक्रारींची दखल घेतली असून छाननी करत आहोत. यासाठी आम्ही इन्कम टॅक्स, तसंच चारचाकीची माहिती घेण्यासाठी आरटीओ विभाग यांची मदत घेणार आहोत,” असं त्या म्हणाल्या आहेत.

“ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार. काही महिला लग्न झाल्यानंतर राज्याबाहेर गेल्या आहेत त्यांना लाभ मिळणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही महिलांनी दोन वेळा अर्ज दाखल केले आहेत असंही त्यांनी सांगितलं. पालकमंत्रीपदाबाबत आमचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतली असं त्या म्हणाल्या आहेत.

लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त
अदिती तटकरे यांनी वेगवेगळ्या पद्दतीने पडताळणी होणार असल्याचं म्हटलं आहे. काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहेत तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता पात्र नसल्याची माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मूळ जीआरमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे देखील अदिती तटकरे यांनी सांगितलं.

1) ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहे अशा अर्जांची होणार पडताळणी
2) चारचाकी वाहन असलेल्या अर्जांची होणार पडताळणी
3) एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार पडताळणी
4) लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी
5) आधार कार्डवर आणि कागद पत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जाची पडताळणी होणार

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...