spot_img
ब्रेकिंगगुडन्यूज! अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा, १६३ कोटींचा निधी मंजूर

गुडन्यूज! अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा, १६३ कोटींचा निधी मंजूर

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांसाठी आनंदाची बातमी आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे डिसेंबर महिन्यातील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने यासाठी तब्बल १६३.४३ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना लवकरच भत्त्याचे पैसे मिळणार आहेत.

नवी मुंबईमधील एकात्मिक बालविकास सेवा यांच्या अखत्यारीत एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते आहे. पण केंद्र सरकारकडून वेळेत निधी प्राप्त होत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे मानधन वेळेत देता येत नाही. हा निधी वेळात देता यावा यासाठी अपर मुख्य सचिवांच्या (वित्त) अध्यक्षतेखाली २ जून २०१७ रोजी महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्य यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर २०२४ या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकूण १६३.४३ कोटी रुपयांचा निधी वितरित आणि खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविकांना त्यांचे थकीत मानधन लवकर मिळण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर २०२४ या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी महायुती सरकारने अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनिसांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

अंगणवाडी सेविकांना सध्या १० हजार रुपये आणि मदतनीसांना ५ हजार रुपये मानधन दिले जाते. सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार रुपयांनी आणि मदतनीसांचे मानधन ३ हजारांनी वाढवणार असल्याची घोषणा केली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...