अहिल्यानगर । नगर सहयाद्री
महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे हायअलर्ट देण्यात आले आहेत. अहिल्यानगरमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यभरात आज मराठवाड्यासह पश्चिम व मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरसह बीड, जालन्यासह परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली भागात पाऊस झाला. विदर्भात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिमसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला.
आता, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले असून कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत. मराठवाड्यातही जोरदार पावसाची शयता असून मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलया ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शयता आहे.
जळगाव, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट असून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुरातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरातही जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. सध्या शेतकर्यांनी खरिपाची पेरणी केली आहे. परंतु बर्याच भागात पावसाने वाट पाहायला लावली आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये बर्याच भागात शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत.