spot_img
आर्थिकगुड न्यूज! आयफोनच्या किंमतीत झाली घट, नव्या किमती ऐकून विश्वास बसणार नाही

गुड न्यूज! आयफोनच्या किंमतीत झाली घट, नव्या किमती ऐकून विश्वास बसणार नाही

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम:-
देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलैरोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मोबाईल फोन आणि चार्जर यांच्यावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर अॅपल कंपनीने मोबाईल फोनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आयफोनच्या सर्वच सिरिजवरील किंमत 3 ते 4 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने सीमाशुल्कात 20 टक्क्यांवरून 15 टक्के घट केल्यानंतर अॅपलने हा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या प्रो आणि प्रो मॅक्स यासारख्या महागड्या फोनच्या किंमती 5100 रुपयांपासून ते 6000 रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. मेड इन इंडिया आयफोन 13, 14 आणि 15 च्या दरातही 300 रुपयांपर्यंत घट झाली आहे. आयफोन एसईच्या किंमती 2300 रुपयांनी कमी झाल्या आहेत. अॅपल कंपनीने पहिल्यांदाच आपल्या काही मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत, याचा ग्राहकांना मोठा फायदा झाला आहे.

आयफोनचे नवे दर पुढीलप्रमाणे आहेत:
– आयफोन एसई (iPhone SE) – 47,600 रुपये
– आयफोन 13 (iPhone 13) – 59,600 रुपये
– आयफोन 14 (iPhone 14) – 69,600 रुपये
– आयफोन 14 प्लस (iPhone 14 Plus) – 79,600 रुपये
– आयफोन 15 (iPhone 15) – 79,600 रुपये
– आयफोन 15 प्लस (iPhone 15 Plus) – 89,600 रुपये
– आयफोन 15 प्रो (iPhone 15 Pro) – 1,29,800 रुपये
– आयफोन 15 प्रो मॅक्स (iPhone 15 Pro Max) – 1,54,000 रुपये

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...