spot_img
ब्रेकिंगआनंदाची बातमी! ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता खात्यात खटाखट जमा...? उपमुख्यमंत्री अजित पवार...

आनंदाची बातमी! ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता खात्यात खटाखट जमा…? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती..

spot_img

मुंबई | नगर सहयाद्री
महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात आजपासून दरमहा ₹१५०० चा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केली.

राज्य सरकारकडून महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी जून महिन्याचा हप्ता मंजूर करण्यात आला आहे. यासाठी तब्बल ₹३६०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, महिलांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

तथापि, काही महिलांना मात्र पुढील महिन्यांपासून या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारने प्राप्तिकर विभागाच्या मदतीने लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची तपासणी सुरू केली असून, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत. योजनेचे गैरवापर रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकटी मिळणार असून, महिलांच्या हातात प्रत्यक्ष रक्कम देण्यामागे ‘स्वावलंबन आणि आर्थिक सशक्तीकरण’ हे उद्दिष्ट असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणूकीत महायुतीला पाठबळ द्या : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निघोज / प्रतिनिधी रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत...

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...

निवडणुकीची रणधुमाळी! उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आघाडी-युतीचे तळ्यात मळ्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली  अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला...

अरणगाव शिवारात दोन गटात राडा; लोखंडी गज, काठीने मारहाण, वाचा प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या...