spot_img
ब्रेकिंगखुशखबर ! टाटाच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारच्या किमती झाल्या कमी, पहा...

खुशखबर ! टाटाच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारच्या किमती झाल्या कमी, पहा…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सध्या इलेक्ट्रिक कारची क्रेझ आहे. इलेक्ट्रिक कार ज्यांना विकत घ्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे.

टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी केल्या आहेत. जर तुम्ही टाटा मोटरची इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला आता स्वस्तात इलेक्ट्रिक कार खरेदी करता येणार आहे. टाटा मोटर्सने पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारच्या किमतीत कपात केली आहे. कंपनीने आपल्या Nexon आणि Tiago Ev या कारची किंमत एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Nexon आणि Tiago च्या अपडेटेड किंमती
टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक मोबिलिटी विभागाने इलेक्ट्रिक कारच्या किमतीत कपात केली आहे. आता कंपनी आपली सर्वात जास्त विक्री होणारी Nexon.ev ही कार 14.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विक्री करणार आहे.

तसेच लॉन्ग रेंज देणारी Nexon.ev (465 किमी) ची किंमतही आता 16.99 लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. तथापि या किमती एक्स शोरूम राहणार आहेत.

कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्मॉल कार Tiago ची किंमत देखील 70,000 रुपयांनी कमी केली आहे. आता या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपये एवढी राहणार आहे.

एकंदरीत, ज्यांना टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल त्यांना आता हे दोन्ही मॉडेल स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांचे मोठे पैसे वाचणार आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Manoj Jarange Patil News : अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला...

तुमचे व्हॉट्सॲप कुठे कुठे आहे चालू? या युक्तीने कळेल क्षणार्धात

नगर सहयाद्री वेब टीम :- WhatsApp हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे, जे प्रत्येकजण...

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजणार; लवकरच मोठा निर्णय होणार?

Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला धूर चारत पुन्हा...

राज्याला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; रोहित पाटलांचा दणदणीत विजय

Politics News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती...