मुंबई | नगर सह्याद्री
मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यावष मान्सून लवकरच दाखल होणार आहे. मान्सून 13 मेपर्यंत अंदमनात- निकोबार दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे दरवषच्या तुलनेत यंदा 8 ते 10 दिवस आधीच आगमन होणार असल्याची माहिती पुण्याच्या हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही आनंदवार्ता आहे.
महत्वाचे म्हणजे, अंदमान- निकोबार बेटांवर मान्सूनच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. हवेचे दाब कमी झाल्याने मान्सूच्या हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात आले आहे. सलग 50 दिवस चाललेल्या उष्णतेचा परिणाम झाल्याने मान्सून यावष 10 दिवस आधी अंदमान-निकोबारमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
यावर्षी देशामध्ये 105 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा एल निनोचा प्रभाव नसल्याने आणि ला निना सारख्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे हवामान खात्याने सांगितले. यंदा मान्सून 13 मेपर्यंत अंदमनात- निकोबार दाखल होणार असल्यामुळे यावष 10 दिवस आधीच मान्सून सगळीकडे दाखल होणार आहे.
यावष पन्नास दिवस देशभरामध्ये उष्णतेची लाट सक्रिय होती. त्यामुळे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापले होते. बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळे संपूर्ण देशाभोवती बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत. याच कारणामुळे मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले आहे.मान्सून दरवष अंदामान-निकोबार बेटावर 18 ते 22 मेच्या सुमारास येतो. पण यावष तो 10 दिवस आधीच दाखल होणार आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण देखील अंदामान-निकोबार बेटावर तयार होण्यास सुरूवात झाली आहे. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्ये 5 ते 6 दिवसांत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
अवकाळीचं संकट! राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
महाराष्ट्रातील अनेक भागात पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर पूर्व अरबी समुद्रापासून पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत आणि दक्षिण तेलंगणापासून वरच्या बाजूला कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे पावसासाठी ते पोषक वातावरण असून 9 मे पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही भागांमध्ये ऊन सावलीचा खेळही पाहायला मिळेल. राज्यात पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर, पूर्वेकडील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राज्याच्या मध्य महाराष्ट्र भागासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला हवामान विभागानं वादळी पावसाच्या धतवर यलो अलर्ट दिला आहे.
अहिल्यानगरसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ढगाळ वातावरण, पावसाची हजेरी यामुळं बहुतांश भागांमध्ये तापमानाच घट झाली आहे. गुरुवारीही राज्यात कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र प्रामुख्यानं अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागात हलक्या सरींची बरसात होऊ शकते. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगर येथे वादळी वाऱ्यासह गारपिट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढचे पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज
काही भागात जोरदार सरींची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला यंत्रणांनी दिला आहे. राज्यात पुढचे पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून विदर्भ आणि मराठवाड्यावर याचा सर्वाधिक परिणाम होईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह गारपीटीने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. यात मका, ज्वारी पिकांसह फळबागायतीचे मोठे नुकसान झाले आहे.