मुंबई / नगर सह्याद्री –
अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ असते, असं सांगितलं जातं. साडेतीन मूहूर्तांपैकी असलेल्या एका मूहूर्तावर सोने खरेदी करावे, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे खरेदीदारांची गर्दी कमी झाली आहे. दरम्यान, आज सोन्याच्या किंमतीत किंचित कपात झाली आहे.जर तुम्हालाही आज अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर सोने खरेदी करायचे असेल तर सोन्याचे भाव चेक करुन जा.
सोन्याचे दर
आज सोन्याच्या नवीन किंमती अपडेट झाल्या आहेत. आज २२ कॅरेट सोने ८९,७५० रुपये प्रति तोळा विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७१,८०० रुपये आहे. सोन्याच्या किंमतीत फक्त ५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे जास्त काही फरक पडणार नाहीये. याचसोबत सोन्यावर जीएसटीदेखील लागणार आहे.
आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ९७,९१० रुपये प्रति तोळा आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७८,३२८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ६० रुपयांनी घट झाली आहे.
आज २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ७३,४४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५८,७५२ रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत फार बदल झालेला नाही.
चांदीची किंमत
आज चांदीच्या किंमतीत थोडी कपात झाली आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत १,००० रुपये आहे. ८ ग्रॅम चांदीची किंमत ८०० रुपये आहे.