spot_img
ब्रेकिंगबळीराजाला खूशखबर! मान्सून केरळात दाखल; 'या' तारखेला महाराष्ट्रारात आगमन होणार?

बळीराजाला खूशखबर! मान्सून केरळात दाखल; ‘या’ तारखेला महाराष्ट्रारात आगमन होणार?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री :-
पुढील दोन दिवसांत मोसमी पाऊस केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. मोसमी पाऊस 25 मेपर्यंत केरळात तर मुंबईत साधारण 1 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढील 2-3 दिवसांत केरळमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होऊ शकते, यापूव, हवामान खात्याने आपल्या मागील अंदाजात 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. परंतू त्यात 4 दिवस कमी अधिक होतील असेही त्यांनी सांगितले. हवामान विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, परिस्थिती अनुकूल आहे आणि मान्सून वेळापत्रकानुसार पुढे सरकत आहे. जर सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर, आम्ही भाकित केल्याप्रमाणे, तो 25 मे पर्यंत केरळच्या किनाऱ्यावर पोहोचू शकतो.

दरम्यान, दक्षिण कोकण आणि गोव्यालगत असलेल्या मध्य, पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते सध्या स्थिर आहे. परिणामी महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

महाराष्ट्रासह 15 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा अलर्ट
मागील 16 वर्षांत प्रथमच मान्सून वेळेआधीच पोहोचला आहे. मागील वेळी 2009 आणि 2001 मध्ये मान्सून 23 मे रोजी दाखल झाला होता. दुसरीकडं, मान्सूनपूर्व सरींनी महाराष्ट्रासह इतर राज्यांत धुमशान घातलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्ये गडगडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. तर बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये 26 मेपर्यंत मुसळधारेचा अंदाज व्यक्त केला आहे. 15 हून अधिक राज्यांत पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर केरळ, कर्नाटक, गोव्यातील काही भागात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

अहिल्यानगरमध्ये संततधार, दक्षिणेत दमदार पाऊस
गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी दक्षिण जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तर शनिवारी सकाळपासून शहरासह जिल्ह्यात संततधार सुरु होती. शुक्रवारी जिल्ह्यात सरासरी 11 मिलीमिटर पाऊस झाला. अहिल्यानगर जिल्ह्यात दमदार मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वादळासह दमदार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. तसेच फळपिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शुकवारी अहिल्यानगर 19.2, पारनेर 13.5, श्रीगोंदा 19.1, कर्जत 17.7, जामखेड 20.1, शेवगाव 14.1, पाथड 26.8 मिलीमिटर पाऊस झाला. तर उत्तरेतील तालुक्यामध्येही कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. दरम्यान 27 मे पर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मान्सून कोणत्या वर्षी किती तारखेला भारतात आला?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 2024 मध्ये मान्सून 30 जून, 2023 मध्ये 8 जून रोजी धडकला होता. 2022 मध्ये 29 मे, 2021 मध्ये 3 जून, 2020 मध्ये 1 जून, 2019 मध्ये 8 जून, 2018 मध्ये 29 मे, 2017 मध्ये 30 मे, 2016 मध्ये 8 जून, 2015 मध्ये 5 जून, 2014 मध्ये 6 जून, 2013 मध्ये 1 जून, 2012 मध्ये 5 जून, 2011 मध्ये 29 मे आणि 2010 मध्ये 31 मे रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकाच घरात ४ जणांचा गळफास, कॅन्सर झाल्यामुळे टाटा स्टीलच्या मॅनेजरचा टोकाचा निर्णय

नगर सह्याद्री वेब टीम : कॅन्सर झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलांसह...

राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू नगरमध्ये येणार; सभापती आ. राम शिंदे यांनी दिली माहिती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) राष्ट्रीय स्मारक होण्याच्यादृष्टीने...

शहिद जवान संदिप गायकर यांचे बलिदान व्‍यर्थ जाणार नाही: मंत्री विखे पाटील

ब्राम्‍हणवाडा येथे शहिद स्‍मारक उभारणार अकोले । नगर सहयाद्री:- शहिद जवान संदिप गायकर यांनी देशाच्‍या सेवेसाठी...

कुत्रा पाळण्यावरुन वाद पेटला, पुढे नको तोच प्रकार घडला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- वैदुवाडी, सावेडी परिसरात कुत्रा पाळण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोन भावांना मारहाण...