spot_img
अहमदनगरयुवकांसाठी खुशखबर! अहिल्यानगर जिल्ह्यात 'तो' प्रोजेक्ट येणार..

युवकांसाठी खुशखबर! अहिल्यानगर जिल्ह्यात ‘तो’ प्रोजेक्ट येणार..

spot_img

तॉरल इंडियाचा दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार; 12 लाख चौरस फूट उत्पादन सुविधेचा विस्तार होणार
पारनेर | नगर सह्याद्री
दावोस, स्वित्झर्लंड – जागतिक स्तरावरील अग्रगण्य इंटिग्रेटेड अल्युमिनियम कास्टिंग फाउंड्री असलेल्या तॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने सुपा (अहिल्यानगर, महाराष्ट्र) येथील 12 लाख चौरस फूट उत्पादन सुविधेचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत एक ऐतिहासिक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. हा सामंजस्य करार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये झाला. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. या सुविधेमुळे 1200 हून अधिक स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, या भागातील समुदायाच्या प्रगतीसाठी एक परिवर्तनकारी पाऊल उचलले गेले आहे.

तॉरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गिते या उपक्रमाबद्दल बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील एका छोट्या शहरातून आल्यामुळे, मी नेहमीच टियर आयआय भागातील अफाट क्षमतेवर विश्वास ठेवला आहे आणि त्यांच्या प्रगतीसाठी संधी शोधण्याचा निर्धार केला आहे. 2020 मध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो तेव्हा त्यांच्याशी या दृष्टिकोनाबद्दल चर्चा करण्याचे भाग्य मला मिळाले आणि आज त्यांच्याच दूरदृष्टीमुळे हे स्वप्न साकार होत असल्याचे पाहून मला अभिमान वाटतो. या भागात जागतिक दर्जाचे कौशल्य आणि तंत्रज्ञान विकसित करून, जागतिक दर्जाची पायाभूत संस्कृती प्रस्थापित करण्याचा आम्हाला विश्वास आहे. स्थानिक क्षेत्रामध्ये जागतिक कौशल्य आणि नवकल्पनांचे संयोजन करून, सुप्याला उत्पादनाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचे आमचे ध्येय आहे. या भागाच्या विकासासाठी नवीन मानके स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

सुपा हे एक धोरणात्मक स्थान असून, प्रमुख बाजारपेठांच्या जवळ असल्यामुळे प्रगत उत्पादनाचे एक केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. तॉरल इंडियाने या भागात विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याने अहिल्यानगरच्या ऊर्जा, संरक्षण, एरोस्पेस, रेल्वे, सागरी, आरोग्यसेवा आणि इतर उच्च-विकास क्षेत्रांमध्ये भारताला पाठिंबा देण्याच्या क्षमतेवरील विश्वास दिसून येतो. तॉरल इंडियाकडे ॲल्युमिनियम सँड-कास्टिंग सोल्यूशन्समध्ये उत्पादन डिझाइनपासून ते गुणवत्तेची चाचणी, पेंटिंग, उत्पादन बांधणी, असेंब्ली आणि वितरणापर्यंत एकाच ठिकाणी सेवा पुरविण्याचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड आहे. पुण्यातील त्यांच्या प्रमुख सुविधेद्वारे त्यांनी अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सेवा पुरविल्या आहेत.

तसेच, जागतिक दर्जाच्या उपाययोजना देऊन पुणे शहराला जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिले आहे. सुपा प्रकल्पाचा विस्तार अहिल्यानगरला औद्योगिक केंद्र बनवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या ध्येयाला मोठे योगदान देईल. या भागात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून, तॉरल इंडिया महाराष्ट्र सरकारला उत्पादन परिसंस्था मजबूत करण्यासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी, कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी, प्रादेशिक आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी पाठिंबा देत आहे.

जर्मनी आणि पोलंडमधील ॲल्युमिनियम कास्टिंग तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या जगप्रसिद्ध थोनी अल्युटेक ग्रुपसोबत संयक्त उपक्रम म्हणून स्थापित, तॉरल इंडियाने भारतात तांत्रिक कौशल्य आणि क्षमता धोरणात्मक पद्धतीने विकसित केल्या आहेत. पुण्यातील तीन लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या सध्याच्या प्रकल्पासह, ही कंपनी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या ब्रँड्ससाठी विश्वासू भागीदार बनली आहे. यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी (संरक्षण), भारतीय रेल्वे, एबीबी, जनरल इलेक्ट्रिक, सिमेन्स आणि ह्योसंग यांसारख्या प्रतिष्ठित क्लायंटचा समावेश आहे. तॉरल इंडियाचा हा विस्तार भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या त्याच्या दृष्टिकोनाला अधिक बळकट करत आहे आणि अहिल्यानगरला महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्यातील एक महत्त्वाचा उत्पादक बनवण्यासाठी सक्षम करीत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी बातमी; निकषात न बसणाऱ्या अर्जाबाबत सरकारने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - केंद्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे....

लाडक्या बहिणींचा बोजा सरकारवर; एसबीआयने व्यक्त केली चिंता

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे....

जिल्हा हमाल पंचायतचे शहरात आंदोलन; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- 26 जानेवारी 1950 ते 26 जानेवारी 2025 भारतीय राज्यघटनेची 75 वर्ष...

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, पुढे नको तेच घडले! अहिल्यानगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार

बीडमधून महिलेचे तीन साथीदार जेरबंद | महिला फरार अहिल्यानगर | नगर सह्याद्री प्रेमाच्या जाळ्यात ओढून...