केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन मागे घेतल्याच्या निर्णयाचे आ.संग्राम जगतापांनी केले स्वागत
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबनाची कारवाई मागे घेतल्याचे जाहीर करत आदेश काढला आहे. यामुळे भारतीय कुस्ती महासंघाला आता देशांतर्गत कुस्ती स्पर्धांचे आयोजन करणे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी करून राज्यातील सर्व पदाधिकारी आणि भारतीय कुस्ती महासंघातील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत करताना अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप म्हणाले, कुस्तीगिरांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुस्तीची कोणती संघटना अधिकृत आहे हा विषय पूर्णतः मिटला आहे. या निर्णयाचा कुस्तीगिरांना खूप फायदा होईल. आता कुस्तीपटू राष्ट्रीय स्पर्धेसाठी चाचण्या देऊ शकतील, तर संलग्न राज्य व जिल्हा संघटना कुस्तीगिरांच्या वेगवेगळ्या पातळीवर निवड चाचण्या घेऊन निवडलेला संघ पुढील राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पाठवू शकेल. त्यामुळे जिल्ह्यातील कुस्तीपटू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील व जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्राल मोठी चालना मिळणार आहे.
जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्रा. डॉ. संतोष भुजबळ म्हणले, भारतीय कुस्ती महासंघाचे २४ डिसेंबर २०२३ ला निलंबित करण्यात होते, त्यामुळे पूर्ण देशातील कुस्ती क्षेत्रात मोठ्याप्रमाणात नाराजी पसरली होती. मात्र आत संघटनेचे निलंबन मागे घेण्यात आले. आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले की, भारतीय कुस्ती महासंघाने त्यांच्या कामकाजात योग्य सुधारना केली आहे, म्हणून संघटनेचे निलंबन उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण निर्णयाचा देशातील व राज्यातील कुस्तीगिरांना खूप फायदा होईल. संघटनेला फेडरेशनचा दर्जा म्हणून पुनर्संचयित करण्यात आले आहे. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघ निवडीचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे,
या निर्णयाचे स्वागत जिल्हा कुस्तीगीर संघाचे खजिनदार शिवाजी चव्हण, कार्यालयीन सचिव नीलेश मदने आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.