spot_img
अहमदनगरपर्यटकांना आनंदवार्ता! मांडओहळ धरण ओव्हर फ्लो..

पर्यटकांना आनंदवार्ता! मांडओहळ धरण ओव्हर फ्लो..

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
तीव्र पाणी टंचाईच्या काळात तालुक्यातील जनतेसाठी जीवनदायीनी ठरणारा मांडओहळ मध्यम प्रकल्प गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागला. सलग तिसर्‍या वर्षी मांडओहोळ धरण तालुयाच्या उत्तर भागातील शेतकर्‍यांसह तालुकावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मांडओहळ प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा ३१० दशलक्ष घनफूट आहे. पळसपूर, नांदुरपठार, सावरगाव परिसरासह मांडओहळ प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणात आज अखेर भरले.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मांडओहळ धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत होता. यापूर्वी झालेल्या पावसामुळे धरण ८० टक्के भरले होते. परंतु सध्या झालेल्या पावसामुळे मांडओहळ धरण पूर्ण क्षमतेन भरले आहे.

पाणी टंचाईच्या काळात दरवर्षी साधारण एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत तालुयातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मांडओहळ धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. या काळात तालुयातील बहुतांशी गावांच्या पाणी योजनांचे उदभव कोरडे पडतात. त्यामुळे मांडओहोळ धरणातून तालुयातील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी टंचाईच्या काळात मांडओहोळ धरण तालुकावासियांसाठी जीवनदायीनी ठरते.


तालुक्यातील ढवळपुरी परिसरातील काळू प्रकल्प ही गेल्या आठवड्यातच पुर्ण क्षमतेने भरला आहे. धरणातील सर्व पाणी संपल्याने धरण कोरडे पडले होते. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी धरणातील साचलेला गाळ वाहून नेला. त्यामुळे धरणाची खोली वाढण्याबरोबरच साठवण क्षमतेतही वाढ झाली आहे.

पर्यटकांनी काळजी घ्यावी
धरण परिसराबरोबरच जवळच असलेला रुईचोंढा धबधबा अहिल्यानगरसह पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरतो. मात्र रुईचोंढा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा यापूर्वी दुर्दैवी घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

२५ वर्षांची गायिका झाली आमदार; अलीनगर मतदारसंघात मिळवला विजय…

Singer Maithili Thakur : भाजपच्या उमेदवार आणि लोकप्रिय लोकगीत गायिका मैथिली ठाकूर यांनी दरभंगाच्या...

वेश्या व्यवसायाचे भांडे फुटले; अहिल्यानगर मधील मोठ्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा..

पाथर्डी । नगर सहयाद्री:- पाथर्डी पोलिस स्टेशनच्या पथकाने १३ नोव्हेंबरच्या रात्री तालुक्यातील भुतेटाकळी फाटा...

श्रीरामपूर: नगराध्यक्ष पदासाठी चौघांची एन्ट्री, तर नगरसेवक पदासाठी दहा उमेदवार रिंगणात ; कोणी केले अर्ज सादर?

श्रीरामपूर / नगर सह्याद्री नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शहरात उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून...

नगर–मनमाड महामार्गावर अग्नितांडव! लक्झरी बस–कारची भीषण धडक; कारचालक जळून ठार

अहिल्यानगर / नगर सह्याद्री – आपल्या बहिणीला आणण्यासाठी कार घेऊन नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथून...