spot_img
अहमदनगरपारनेरच्या पठार भागाला खुशखबर! ४५ वर्षांच्या इतिहासात सर्वात मोठे यश; कोरडवाहू भागासाठी..

पारनेरच्या पठार भागाला खुशखबर! ४५ वर्षांच्या इतिहासात सर्वात मोठे यश; कोरडवाहू भागासाठी..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री-
आजवर कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपात पारनेरच्या कोरडवाहू भागासाठी पाणीच शिल्लक नसल्याचे वारंवार भासवले जात असले तरी आता पारनेर तालुक्यातील कोरडवाहू भागातील ४५ गावांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा समावेश कुकडी सुधारीत जलनियोजन अहवालात होणारच असा विश्वास कान्हूर पठार येथील व्यवहारे मंगल कार्यालयात आज रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी पुढील दिशा ठरविण्याबाबत संपन्न झालेल्या महत्वपूर्ण नियोजन बैठकीत विश्वनाथ कोरडे यांनी व्यक्त केला.

सबंधित नियोजन बैठकीस कोरडे यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, सबंधित योजनेसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव शिंदे कान्हूर पठार गावचे माजी सरपंच गोकुळमामा काकडे, महादू नवले, उद्योजक अब्बासभाई मुजावर, सखाराम ठुबे, साहेबराव वाफारे, बाळासाहेब रेपाळे, अनिल तिकोने, प्रदीप वाळूंज, काकणेवाडी गावचे माजी सरपंच निवृत्ती वाळूंज, पोपटराव लोंढे, कुशाहारी भांड, पंढरीनाथ भागवत, संभाजी आमले, विलास झावरे, दौलत फापाळे, प्रकाश ठाणगे, डॉ.सुरेश खणकर, भाऊसाहेब जगदाळे, दत्तात्रय जगदाळे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष अर्जुन नवले, भुमीपुत्र फार्मर प्रोडुसर कंपनीचे चेअरमन कानिफनाथ ठुबे, निवृत्ती चौधरी, सिताराम नरवडे, प्रभु भागवत, गोकुळ वाळूंज, गणेश चौधरी, राजू मोरे, दिलीप पारधी, जगदीश आंबेडकर, रवि पायमोडे यांसह विविध गावांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

यावेळी कोरडे यांनी गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याच्या पत्रांच्या प्रति उपस्थितांना दाखवत दिनांक २१ जून २०२४ च्या MKVDC आणि WAPCOS यांच्यात ‘कॅरी आऊट स्टडीज फॉर प्लॅनिंग’ साठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराचा व कुकडी इरीगेशन सर्कल, पुणे यांच्या १३/०६/२०२४ रोजीच्या पत्राचा संदर्भ देत महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १ नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे. यांनी डॉ. शंभू आझाद, मुख्य कार्यकारी संचालक, M/S WAPCOS Ltd. याच्याकडे खंडेश्वर उपसा सिंचन योजना, पारनेर या योजनेत समाविष्ट करण्याची नवीन मागणी स्थानिक लोकांकडून श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिफारशीसह प्राप्त झाल्याचा उल्लेख करत पारनेर तालुक्यातील खंडेश्वर उपसा सिंचन योजना या ४५ गावांतील ३४८८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असलेल्या योजनेच्या मागणीचा समावेश करण्यासंदर्भात कुकडी सुधारित जलनियोजन अहवाल तयार करताना विचार करावा, असा आदेश केल्याचे पत्र दाखवताच उपस्थितांनी आनंदाने टाळ्यांचा कडकडाट केला.

राजकारण दूर ठेवणे एकत्र या..
कोरडे यांनी उपसा सिंचन योजनेबाबत मिळविलेले यश हे या योजनेच्या ४५ वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठे यश आहे. यापुढे त्यांनीच योजनेच्या पूर्ततेसाठी नेतृत्व करावे, असा विचार मांडत तालुक्यातील या भागातील जनतेने राजकारण दूर ठेवून काम करणाऱ्या माणसाच्या सोबत उभे राहिले पाहिजे, असे आवाहन यावेळी काही वक्त्यांनी केले. सबंधित योजनेच्या ४५ लाभार्थी गावातून एक वा दोन सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती त्यांच्या सहकार्यासाठी देण्याचे यावेळी ठरविण्यात आले. त्या व्यक्तींनी आपापल्या गावात जनजागृती करण्याची जबाबदारी स्विकारणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...