spot_img
ब्रेकिंगशिक्षकांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; राज्यातल्या हजारो शिक्षकांना होणार फायदा?

शिक्षकांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; राज्यातल्या हजारो शिक्षकांना होणार फायदा?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
शिक्षकांच्या पेन्शन संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना सरकार पेन्शन देणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यातल्या हजारो शिक्षकांना या घोषणेचा फायदा होणार आहे.

जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याचा जितका पगार होता त्याच्या निम्मा पगार पेन्शन म्हणून मिळत होता. मेडिकल भत्ता आणि मेडिकल बिल रिम्बर्समेंटची सुविधा होती. ग्रॅच्युईटी दिली जात होती. जुन्या योजनेत पेन्शन विक्री करण्याची सुविधा होती. कर्मचाऱ्यांच्या मागे त्यांच्या पती-पत्नीलाही ही पेन्शन मिळण्याची सुविधा आहे. मात्र, या निवृत्तीवेतनाचा संपूर्ण भार सरकारी तिजोरीवर पडत असल्याने त्यात बदल करण्यात आले.

नव्या पेन्शन योजनेत अनेक तरुतुदींचा समावेश नसल्याने त्यालाही विरोध झाला. आता मुख्य़मंत्र्यांनी २००५ नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देण्याची घोषणा केली असली तरी याबाबत कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही. ही पेन्शन योजना जुनी असेल की नवी…की यात आणखी काही बदल केले जातील. याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...