मुंबई। नगर सहयाद्री-
राज्यात अनेक वर्षांपासून शाळेची वेळ ठरलेली आहे. परंतु आता ही परंपरा तोडली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा केली आहे. शाळांची वेळ बदलली असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे.
राज्यापाल रमेश बैस यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना केली होती. राज्यामध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात. तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरतात. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय 12 वर्षांच्या पुढे तर प्राथमिक शाळांमधील मुलांचे वय 3 ते 10 वर्ष असते.
त्यामुळे प्राथमिक शाळा दुपारी हव्यात आणि माध्यमिक शाळा सकाळी हव्यात, अशी सूचना शिक्षणतज्ज्ञांकडून येत होत्या. त्यामळे शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.