spot_img
अहमदनगरविद्यार्थ्यांना खुशखबर: आता हेलपाटे अन लूट थांबणार, काय म्हणाले विखे पाटील पहा...

विद्यार्थ्यांना खुशखबर: आता हेलपाटे अन लूट थांबणार, काय म्हणाले विखे पाटील पहा…

spot_img

लोणी / नगर सह्याद्री
महाविद्यालयांमध्‍ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्‍याचा अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील प्रयोगाला मिळालेला विद्यार्थ्‍यांचा प्रतिसाद पाहाता राज्‍यातील सर्वच महाविद्यालयांमध्‍ये हे केंद्र आता सुरु करण्‍याचा निर्णय विभागाने घेतला असल्‍याची माहीती महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयामध्‍ये आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्यात आले. प्रांताधिकारी माणीकराव आहेर, तहसिलदार अमोल मोरे, डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचे सर्व संचालक, विद्यार्थी आणि प्राध्‍यापक उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यांना लागणारे शैक्षणिक दाखले महाविद्यालयातच शासकीय दराने उप‍लब्‍ध व्‍हावेत या उद्देशाने आपल्‍या जिल्‍ह्यात युवा ही दुवा ही योजना प्रायोगिक तत्‍वावर सुरु करण्‍यात आली होती. जिल्‍ह्यातील १५ महाविद्यालयांमध्‍ये हे सेवा केंद्र सुरु करुन, विद्यार्थ्‍यांना शासकीय दाखल्‍याची सेवाही सुरु केली होती. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्‍यांना शासकीय दाखल्‍यांसाठी शासनाच्‍या कार्यालयात तसेच सेतू केंद्रात मारावे लागणारे हेलपाटे कमी व्‍हावेत, त्‍यांची आर्थिक लुट होवू नये हा विचार घेवून महाविद्यालयांमध्‍ये आपले सेवा केंद्र सुरु करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता.

या प्रायोगित तत्‍वावरील संकल्‍पनेला महाविद्यालय आणि विद्यार्थ्‍यांनी दिलेला सकारात्‍मक प्रतिसाद पाहाता राज्‍यातील सर्वच महाविद्यालयांमध्‍ये आता आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. या माध्‍यमातून अतिशय कमी कालावधीत विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या शैक्षणिक प्रवेशासाठी तसेच कुटूंबासाठी आवश्‍यक असलेले कागदपत्र सहज उपलब्‍ध होण्‍यास मदत होणार असून, यासर्व सेतू केंद्रांचे नियंत्रण जिल्‍हाधिकारी कार्यालयातून सुरु राहणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मार्केटयार्डमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जाळून खाक

दीड लाखांचे नुकसान, वर्षानुवर्षांची बिले जळून खाक! अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मार्केटयार्डमधील जयप्रकाश कस्तुरचंद कटारिया...

लाडक्या बहि‍णींवर सरकारचा लेटरबॉम्ब! ‘या’ महिलांनाच मिळणार दीड हजार

मुंबई / नगर सह्याद्री - 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील सर्व लाभार्थींना ईकेव्हायसी बंधनकारक करण्यात...

नगरमध्ये जात प्रमाणपत्रासाठी १८ हजार रुपयांची लाच; ‘ती’ महिला जाळ्यात

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शहरातील जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात एका खाजगी महिलेच्या...

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेला धमक्या; हुंडा, अत्याचार, कुठे कुठे काय काय घडलं पहा

विवाहितेची पती-सासरच्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा अहिल्यानगर / नगर सह्याद्री - लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच...