मुंबई । नगर सहयाद्रील-
फेब्रुवारी महिना संपायला अवघी काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. हा महिना २८ दिवसांचा असल्याने महिन्याचा शेवट लवकर होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना आणि पालकांना सर्वात जास्त उत्सुकता असते ती सुट्यांची.
याचे कारण म्हणजे मुलांना सुट्ट्या मिळाल्या तर पालक त्यांना बाहेर घेऊन फिरवायला जायचा प्लान आखतात. मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठ्या सुट्ट्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. त्यानुसार पालक फिरायला जायचा प्लान करू शकतात. नेमक्या मार्च आणि एप्रिल महिन्यात किती सुट्या असणार आहेत.
मार्च महिन्यातील सुट्ट्या:
होळी – १३ मार्च (बुधवार)
धूलिवंदन – १४ मार्च (गुरुवार)
छत्रपती शिवाजी महाराज जयंती – १७ मार्च (सोमवार)
गुढीपाडवा – ३० मार्च (रविवार)
रमजान ईद – ३१ मार्च (सोमवार)
एप्रिल महिन्यातील सुट्ट्या:
राम नवमी – ६ एप्रिल (रविवार)
महावीर जयंती – १० एप्रिल (गुरुवार)
गुड फ्रायडे – १८ एप्रिल (शुक्रवार)