अहमदनगर। नगर सहयाद्री
वाडियापार्क क्रीडा संकुल हे जिल्ह्यातील खेळाडुंसाठी मुख्य केंद्रबिंदू असून या ठिकाणी क्रीडा सुविधांचे बळकटीकरण व नवीन खेळाडुंच्या क्रीडा सुविधा खेळाडुंसाठी निर्माण व्हाव्यात यासाठी शासनाकडे सुमारे ५२ कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्यावतीने राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडे पाठविण्यात आला होता. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक झाली. यात वाडियापार्क क्रीडा संकुलाच्या क्रीडा सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही किरिअर करण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तरी खेळाडुंना विविध खेळाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेच्या आहेत. यासाठी यापूर्वी शासनाच्या माध्यमातून सारसनगर येथे विविध खेळांचे क्रीडा संकुल उभे राहत असून त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी खेळाडुंना विविध खेळाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
वाडियापार्क क्रीडा संकुलात खेळाडुंना चांगल्या दर्जेच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी यापूर्वी पाहणी केली होती. मंत्रालयामध्ये बैठक झाली. वाडियापार्क क्रीडा संकुलाच्या बळकटीकरण करण्यासाठी व नवीन खेळाडुंच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. भविष्यकाळात वाडियापार्क क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अहमदनगर शहरात व जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील असे मत आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
‘या’ सुविधा अद्ययावत होणार
वाडिया पार्क संकुलात विविध खेळाच्या सुविधा उपलब्ध होणार असून संपुर्ण मैदानावर लॉन, किक्रेट खेळांडूसाठी आंतराराष्ट्रीय दर्जेच्या तीन टर्फ विकेट, फ्लड लाईटची सुविधा, धाव पट्टूंसाठी ४०० मीटर धावण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक, कुस्ती पटुंसाठी मातीचा हौद, बॉसिंग, बॅडमिंटन हॉल, रायफल शुटींगसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले मैदान, २ सिथेंटीक टेनिस कोर्ट ची निर्मीती, कबड्डी, खो – खो व बास्केट बॉलची मैदान तयार करुण त्यावरती डोम कव्हर बसविण्यात येणार आहे. खेळाचे समोलचन करण्यासाठी कक्षाची निर्मीती, संपुर्ण प्रेक्षक बैठक व्यवस्थेला रोप कव्हर बसविण्यात येणार आहे. वाडियापार्कमध्ये सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. नागरीकांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक जिम, खेळाडुंसाठी अत्याधुनिक व्यायामशाळेची निर्मिती करण्यात येणार आहे.