spot_img
ब्रेकिंगसोलापूरकरांसाठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

सोलापूरकरांसाठी गुडन्यूज! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

spot_img

सोलापूर / नगर सह्याद्री :
सोलापूर विमानतळाहून पुढील दहा दिवसात ‘उड्डाण’ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी हवाई सफर करता येणार आहे. त्यामुळे सोलापूर – मुंबई आणि सोलापूर – गोवा विमानसेवा सुरु होण्यातला मोठा अडथळा दूर झाला आहे. सोलापूरकरांची बहुप्रतीक्षित थेट विमानसेवा सुरू होणार आहे.

होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार असून मुंबई आणि गोवा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत, अशी माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी दिली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचाच्या अथक प्रयत्नांमुळेच हे स्वप्न साकार होऊ शकले आहे. सोलापूरकरांसाठी हे अत्यंत अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण आहेत.

मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक-
सोलापूर – मुंबई
सकाळी 9:40 वाजता विमान उडणार (सकाळी 10:40 मुंबईत आगमन)
मुंबई – सोलापूर
दुपारी 12:45 वाजता विमान उडणार (दुपारी 1:45 सोलापुरात आगमन)

गोवासाठी उड्डाण वेळापत्रक-
सोलापूर – गोवा
दुपारी 2:15 वाजता विमान उडणार (दुपारी 3:15 गोव्यात आगमन)
गोवा – सोलापूर
सकाळी 8:10 वाजता विमान उडणार (सकाळी 9:10 सोलापुरात आगमन)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...