spot_img
ब्रेकिंगसाईभक्तांसाठी खुशखबर! शिर्डीत ‘डोनेशन पॉलिसी’; काय-काय सुविधा मिळणार?

साईभक्तांसाठी खुशखबर! शिर्डीत ‘डोनेशन पॉलिसी’; काय-काय सुविधा मिळणार?

spot_img

शिर्डी । नगर सहयाद्री
शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून ही धोरण तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवली जाणार आहे. यामध्ये विशेषतः मोठ्या देणगीदारांना व्हीआयपी आरती व दर्शनाची सुविधा देण्यात येणार आहे. या नव्या धोरणानुसार, आता 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांनाही साईबाबा मंदिरातील आरतीचा विशेष लाभ मिळणार आहे. याआधी ही मर्यादा 25,000 रुपये इतकी होती.

याबाबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की, साईबाबांच्या दर्शनासाठी भारतभरातून लाखो साई भक्त येत असतात. साई भक्तांचे दर्शन चांगल्या रीतीने व्हावे, त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी साईबाबा संस्थानने प्रयत्न केलेला आहे. जे साई भक्त इथे देणगी देतात, त्यांची मागणी होती की, देणगी दिल्यानंतरच्या सुविधा साईबाबा संस्थानने निर्माण करावा, त्या अनुषंगाने संस्थानने नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ तयार केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

कशी आहे डोनेशन पॉलिसी?
– दहा हजार ते पन्नास हजार देणगी देणाऱ्या भाविकांना आरतीचा लाभ मिळणार. पाच सदस्यांसाठी देण्यात येणार सुविधा.

– 50 हजार ते एक लाख देणगी देणाऱ्या भाविकांसाठी दोन आरत्यांचा लाभ तसेच वर्षातून एकदा कुटूंबातील पाच सदस्यांना मोफत दर्शनाचा लाभ.

– 1 लाख ते 10 लाख देणगी देणाऱ्यांना दोन व्हीव्हीआयपी आरत्यांचा लाभ, तसेच वर्षातून एकदा दर्शनाची लाईफटाईम सुविधा.

– 10 लाख ते 15 लाख वर्षातून दोन व्हीव्हीआयपी आरती तसेच वर्षातून एकदा पाच सदस्यांना लाईफटाईम व्हीआयपी दर्शनाची सुविधा.

– 50 लाखांच्या पुढे तीन व्हीव्हीआयपी आरती तर वर्षातून दोनदा लाईफटाईम व्हीआयपी दर्शनाची सुविधा.

– तसेच पंढरपूरच्या धर्तीवर सामान्य दर्शनरांगेतील सुरूवातीला आलेल्या दोन भाविकांना मिळणार आरतीचा लाभ.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान मोदी पोहचले थेट आदमपूर एयरबेसवर; जवानांसोबत साधला संवाद

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला मोठा धडा शिकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र...

पश्चिम देवस्थान समितीचा मोठा निर्णय; अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात ‘या’ ड्रेस कोडला बंदी

कोल्हापूर / नगर सह्याद्री : कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू...

निष्ठावंतांना पुन्हा मिळाली संधी! भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी दिलीप भालसिंग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष पदाची...

राज्यात नव्या वाळू धोरणास मंजुरी; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय!, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आता…’

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी देण्यात आली आहे....