आमदार काशीनाथ दाते यांची माहिती | आणखी १५ बस दाखल होणार
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर-नगर मतदारसंघातील राज्य परिवहन महामंडळाच्या पारनेर आगारात नवीन बसेस मिळणेबाबत परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांना आमदार काशिनाथ दाते यांनी निवेदन दिले होते. परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्या मागणीची दखल घेऊन पारनेर आगारात नवीन १० बसेस मंजूर करण्यात आल्या असून या बसेसचे लवकरच वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार काशिनाथ दाते यांनी दिली.
मंत्रालय येथे परिवहन मंडळाच्या विविध प्रश्नांबाबत परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार काशिनाथ दाते, आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार दाते म्हणाले की, पारनेर आगारातील बसेस या खुप जुन्या व जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे या बसेसमधुन प्रवाशांना प्रवास करणे धोकादायक झाले होते. प्रवास करताना तालुयातील वृद्ध, महाविदयालयीन व शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थींनी, रुग्ण व प्रवाशांना खुप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या मागील वीस ते पंचवीस वर्षात पारनेर एस.टी आगारात एकही नवीन बस आलेली नाही. पंचवीस बसेसची आवश्यकता आसल्याचे निवेदन राज्याचे परीवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांना देऊन याबाबत सहकार्य करावे अशी चर्चा केली होती. या मागणीची दखल घेऊन परिवहन मंत्री सरनाईक यांनी नवीन १० बसेस मंजूर केले आहेत. या बसेस आगाराच्या ताफ्यामध्ये लवकरच सामाविष्ट होणार असुन टप्प्याटप्प्याने आणखी १५ बसेस देण्याचे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले आहे.