spot_img
अहमदनगरपारनेरकरांना खुशखबर; शेतकऱ्यांना मिळणार १०५ कोटी, विश्वनाथ कोरडे काय म्हणाले पहा...

पारनेरकरांना खुशखबर; शेतकऱ्यांना मिळणार १०५ कोटी, विश्वनाथ कोरडे काय म्हणाले पहा…

spot_img

गणेश जगदाळे / नगर सह्याद्री –
सन २०२३ च्या खरिपाच्या पिकविम्यापोटी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १०५ कोटी रुपये इतकी रक्कम अधिकृतरीत्या जाहीर झाली असून लवकरच शासनाकडून ठरवून देण्यात येणाऱ्या गाईड लाईननुसार कुठल्या पिकासाठी नेमकी किती प्रमाणात रक्कम वितरीत होईल हे ठरविण्यात येणार असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

तालुक्यातील नैसर्गिक परिस्थिती पाहून सबंधित पीकविमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी श्री.कोरडे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी म्हटले असून आजवर केलेल्या पत्रव्यवहाराचे पुरावेही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांसमोर मांडले. यावेळी कोरडे यांच्या सोबत भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, जिल्हा सरचिटणीस सुनिल थोरात, जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी दुधाडे, राळेगण थेरपाळ गावचे सरपंच पंकज कारखिले, अशोक चेडे, किरण कोकाटे, अर्जुन नवले, नवनाथ सालके, सोपान मुंजाळ, तुकाराम येवले, गोकुळ ठुबे, सखाराम भागवत यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी होत असलेल्या विविध उपाययोजनांची व मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची माहितीही देण्यात आली. पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या १०५ कोटी रुपये पिकविम्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महायुती सरकारचे आभारही कोरडे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मानले.

२०२३ च्या खरीप हंगामात मुग, सोयाबीन, बाजरी, तुर, कांदा व उडीद या पिकांच्या ७१२५५ हेक्टर क्षेत्राचा ५७१८५ एकूण शेतकऱ्यांनी १४८८३४ अर्जांद्वारे पीकविमा उतरविण्यात आला असल्याचे सांगत सबंधित पीकविमा भरताना शेतकऱ्यांनी १ रुपया तर राज्य सरकारने २३९९१४५८८ इतकी तर केंद्र सरकारने १६८३८५३७३ अशी एकूण ४०८४४८७९६ रुपये रक्कम भरण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनची १६.५० कोटी इतकी अग्रिम रक्कम खात्यावर जमा करण्यात आली होती आणि आता सन २०२३ च्या पिकविम्यापोटी १०५ कोटी इतकी रक्कम पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या १५ ते २० दिवसांत वर्ग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान मोदी पोहचले थेट आदमपूर एयरबेसवर; जवानांसोबत साधला संवाद

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला मोठा धडा शिकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र...

साईभक्तांसाठी खुशखबर! शिर्डीत ‘डोनेशन पॉलिसी’; काय-काय सुविधा मिळणार?

शिर्डी । नगर सहयाद्री शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली...

पश्चिम देवस्थान समितीचा मोठा निर्णय; अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात ‘या’ ड्रेस कोडला बंदी

कोल्हापूर / नगर सह्याद्री : कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू...

निष्ठावंतांना पुन्हा मिळाली संधी! भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी दिलीप भालसिंग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष पदाची...