spot_img
अहमदनगरपारनेरकरांना खुशखबर! मंत्री विखे पाटील म्हणाले, पुढील काळात..

पारनेरकरांना खुशखबर! मंत्री विखे पाटील म्हणाले, पुढील काळात..

spot_img

आ. काशिनाथ दाते यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यावर विखे कुटुंबाचे विशेष प्रेम आहे. पारनेर तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असून काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून आता तालुक्यात विकास कामांना भरीव निधी देणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते सर यांनी मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले, सुपा या ठिकाणी असलेल्या एमआयडीसीच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असून तालुक्यातील वाढती गुन्हेगारी व दहशतवाद मोडीत काढण्यासाठी प्रयत्नशील आहे व तालुक्यातील अवैद्य धंद्यांना आळा घालण्यासाठी या पुढील काळात प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे.

पारनेर तालुका एक पुरोगामी विचारांचा सुसंस्कृत तालुका आहे. मतदारसंघ आता एका चांगल्या माणसाच्या हातात आल्यामुळे निश्चितच तालुक्याचा विकास होणार असून आम्ही काशिनाथ दाते यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, लाडके बहीण योजना समितीचे तालुका अध्यक्ष सुनील थोरात, सरपंच मनोज मुंगसे आदी. यावेळी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; कुठे घडला प्रकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे....

घरात घुसून महिलेसोबत ‘तसले’ वर्तन; रावसाहेबवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात मद्य सेवन केलेल्या व्यक्तीने महिलेच्या घरात जबरदस्ती...

गावच्या विकासासाठी आमदार काशिनाथ दातेंनी दिला कानमंत्र; काय म्हणाले पहा…

नेप्तीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन अहिल्यानगर | नगर सह्याद्री गावा-गावातील धार्मिक एकात्मता भारतीय संस्कृतीने जोडली गेलेली आहे....

‘पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ४.४३ कोटींचा नफा’

संस्थापक आ. काशिनाथ दातेंची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पारनेर...